Home ब्रेकिंग न्यूज Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

0
Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. रविवारी रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांनी मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी करायला सुरुवात केली. यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत २७ मुलगे आणि ५ मुली अशा एकूण ३२ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/08/10/three-girls-died-of-snakebite-in-gadchiroli-three-others-were-airlifted-to-the-hospital/

अन्नातून विषबाधा प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. आता १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

https://prahaar.in/2026/08/10/a-fake-work-order-racket-worth-%e2%82%b9500-600-crore-under-the-guise-of-the-kumbh-mela/

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थडके यांच्या मार्गदर्शनाखाली डीएमओ डॉ. प्रसाद नुनेवार, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. मोहम्मद उस्मान, डॉ. रवी काळे, डॉ. संतोष आत्मलवार, डॉ. संजय लाडके, डॉ. शेख मुजीब, डॉ. काझी तसेच परिचारिका कल्पना दीक्षित व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर वेळेत उपचार केले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

https://prahaar.in/2026/08/10/deputy-chief-minister-eknath-shinde-directs-that-employees-with-more-than-ten-years-of-service-be-absorbed-into-the-workforce/

दरम्यान, आश्रमशाळेच्या स्वयंपाकघरातून अनेक पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या अन्नाची गुणवत्ता, स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नसाठवणुकीची पद्धत तसेच मांसाहारी भोजन तयार करताना अन्नसुरक्षेचे निकष पाळण्यात आले होते का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे.