Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Police : मुंबई पोलीस दलात खळबळ! सात महिन्यांत १२ जण निलंबित, ३ जण थेट बडतर्फ; शिस्तभंग करणाऱ्यांवर वरिष्ठांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

Mumbai Police : मुंबई पोलीस दलात खळबळ! सात महिन्यांत १२ जण निलंबित, ३ जण थेट बडतर्फ; शिस्तभंग करणाऱ्यांवर वरिष्ठांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

0
Mumbai Police : मुंबई पोलीस दलात खळबळ! सात महिन्यांत १२ जण निलंबित, ३ जण थेट बडतर्फ; शिस्तभंग करणाऱ्यांवर वरिष्ठांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील शिस्तभंग आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या सात महिन्यांत १२ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, तर तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वेतन घोटाळा, कर्तव्यातील निष्काळजीपणा, गैरवर्तन, विनापरवानगी गैरहजेरी आणि आर्थिक अनियमितता यांसारख्या प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

वेतन घोटाळ्याचा गुन्हे शाखेकडून तपास :

मुंबई पोलिसांच्या वेतन घोटाळा प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सेवार्थ प्रणालीतील डिजिटल नोंदी, लॉगिन तपशील, वेतन मंजुरीची प्रक्रिया तसेच संबंधित बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. या गैरप्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Mumbai Police)

https://prahaar.in/2026/08/09/monsoon-to-become-active-again-in-maharashtra-meteorological-department-forecasts-an-increase-in-rainfall-intensity-from-august-13/

आंदोलकांना धमकी दिल्याचा आरोप :

अमली पदार्थविरोधी कारवाईशी संबंधित एका प्रकरणात तरुण आंदोलकांना एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यात अडकवण्याची कथित धमकी दिल्याचा आरोप एका पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, त्याची तात्काळ बदलीही करण्यात आली होती. (Mumbai Police)

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातही बडतर्फी :

यापूर्वी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस शिपाई श्याम सोनावणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. याशिवाय दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवरही निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक अनियमिततेच्या आरोपांप्रकरणी दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Police)

https://prahaar.in/2026/08/09/young-man-arrested-for-sexually-abusing-boys-and-men-over-600-objectionable-videos-found-on-his-mobile-phone/

‘शिस्तीशी तडजोड नाही’; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्पष्ट संदेश :

मुंबई पोलीस दलातील शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी कायम ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. विभागीय चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिस्थितीनुसार कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई केली जात आहे. या कारवायांमुळे पोलीस दलातील बेशिस्तीला आळा घालण्याचा आणि कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here