डोंबिवली : कल्याण – डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८ टक्के भरले आहे. मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. लवकरच बारवी धरण ओसंडून वाहू लागेल, अशी स्थिती आहे. रविवारी ९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या नोंदीनुसार बारवी धरण ९९.८८ टक्के भरले आहे. बारवी धरणाची सध्याची पाणीपातळी आणि ओव्हरफ्लो पातळी यांत केवळ ०.०१ मीटरचे अंतर उरले आहे.
https://prahaar.in/2026/08/09/trainer-aircraft-crashes-in-baramati-2nd-incident-since-ajit-pawars-accident/
एमआयडीसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बारवी धरणाची सध्याची पाणीपातळी ७२.५९ मीटर झाली आहे. धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ३३८.४४ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला आहे. बारवी धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरण ओसंडून वाहू लागण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/08/08/all-mps-from-the-sharad-pawar-faction-will-meet-the-prime-minister-on-monday/
धरणातील वाढत्या पाणीसाठ्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. धरणाच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने विसर्ग करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरण लवकर भरल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या २४ तासांत बारवी धरण पूर्ण भरून ओसंडून वाहू लागण्याची शक्यता आहे.