Home महाराष्ट्र नाशिक Nashik : उघड्या वितरण पेट्या, लोंबकळणाऱ्या तारा दिसल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर करा तक्रार, महावितरणने सुरु केला विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

Nashik : उघड्या वितरण पेट्या, लोंबकळणाऱ्या तारा दिसल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर करा तक्रार, महावितरणने सुरु केला विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

0
Nashik : उघड्या वितरण पेट्या, लोंबकळणाऱ्या तारा दिसल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर करा तक्रार, महावितरणने सुरु केला विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

Nashik : नाशिकमध्ये वीज वितरण यंत्रणेतील धोकादायक त्रुटींवर आता नागरिकांना थेट तक्रार करता येणार आहे. महावितरणच्या नाशिक मंडळाने (Mahavitaran’s Nashik Circle) यासाठी विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ७८७५४४४२३५ सुरू केला आहे. उघड्या वितरण पेट्या, तुटलेली किंवा झाकण नसलेली मिनी पिलर्स, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, वीजवाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या, तसेच वाकलेले किंवा धोकादायक अवस्थेतील विद्युत खांब आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर (WhatsApp number) पाठवायची आहे.

https://prahaar.in/2026/08/08/horrific-accident-on-deola-malegaon-road/

फोटो आणि लोकेशन पाठवा

तक्रार करताना संबंधित ठिकाणाचा स्पष्ट फोटो आणि अचूक गुगल मॅप लोकेशन पाठवणे आवश्यक आहे. तक्रार प्राप्त होताच संबंधित पथकाकडून पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जाणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात शहर विभाग-१ मधील १०५, तर शहर विभाग-२ मधील ८० मिनी पिलर्स आणि वितरण पेट्यांना नवीन झाकणे बसवण्यात आली आहेत. नादुरुस्त झाकणांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/08/08/akshay-lilke-planted-indias-flag-at-the-asian-marathon-championship-in-japan/

‘त्या’ तक्रारी स्वीकारणार नाही

मात्र, वीज वितरण यंत्रणेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ७८७५४४४२३५ हा क्रमांक केवळ धोकादायक वीज यंत्रणेबाबत फोटो आणि लोकेशनसह तक्रार करण्यासाठी आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी या क्रमांकावर स्वीकारल्या जाणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here