Home ब्रेकिंग न्यूज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

0
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र चव्हाण; अमित साटम; मुंबईच्या महापौर रितू तावडे , अतिरिक्त मुख्य सचिव गृह मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. चेरिंग दोरजी; आणि राजशिष्टाचार उप सचिव, चंद्रकांत मोरे उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/08/07/do-not-worry-i-am-with-you-prime-ministers-assurance-to-rebel-mps-from-trinamool-and-ubt-mps/

अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजता अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर, केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून ते सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी त्यांची अनौपचारिक भेट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी काही मुद्यांवर अमित शाह सविस्तर चर्चा करण्याचीही शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here