मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘लोकल ट्रेन’ (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. लोकल डब्यामध्ये किरकोळ कारणांवरून होणारे वाद आणि मारहाणीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच, आता वडाळा स्थानकाजवळ घडलेली एक संतापजनक घटना समोर आली आहे. लोकलमध्ये एका पुरुषाने महिलेला मारहाण करत बेल्ट काढून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सीटवर झोपल्यावरून वाद; पट्टा काढून महिलेला धमकी
No one deserves to be slapped, beaten, or humiliated. Speak up. Stand with survivors. Break the cycle of abuse. Silence protects the abuser, not the victim. #mumbailocal #Mumbai #StopViolenceAgainstWomen #endabuse #publicsafety #maharashtra #mumbai #eknathshinde @mieknathshinde pic.twitter.com/gYIPbajuaH
— ♥️🦮♥️ (@Agy400) August 6, 2026
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना वडाळा स्थानकाजवळून जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. लोकलमध्ये सीटवर झोपलेल्या एका महिलेसोबत संबंधित पुरुष प्रवाशाची बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या पुरुषाने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, स्वतःच्या कमरेचा बेल्ट (पट्टा) काढून त्याने महिलेला मारण्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
https://prahaar.in/2026/08/07/assam-hailakandi-minor-gangrape-murder-five-juveniles-arrested-sit-investigation/
आजूबाजूचे प्रवासी मात्र पाहतच राहिले:
या सर्व घटनेतील अत्यंत चीड आणणारी आणि धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा तो पुरुष महिलेला अमानुषपणे धमकावत मारहाण करत होता, तेव्हा डब्यात उपस्थित असलेले इतर सहप्रवाशी मात्र निव्वळ मूकदर्शक बनून हा प्रकार पाहत राहिले. एकाही प्रवाशाने पुढे होऊन त्या पुरुषाला रोखण्याचा किंवा त्या महिलेच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केला नाही. या उदासीनतेबद्दल सोशल मीडियावर युजर्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वे पोलिसांच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा:
हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अजून रेल्वे पोलीस (GRP) प्रशासनाकडून अधिकृत विधान किंवा स्पष्टीकरण आलेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करून संबंधित दोषी पुरुषाचा शोध घेतला जाईल आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.