मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील अन्य तीन प्रवासी किरकोळ जखमी होऊन बचावले. ( Mumbai Pune Expressway)
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त फॉर्च्युनरमधील पाचही प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील रहिवासी आहेत. ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना मिसिंग लिंक बोगद्यात हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कारने समोरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Missing Link)
https://prahaar.in/2026/08/07/a-policy-decision-will-be-taken-regarding-the-redevelopment-of-markets-in-mumbai/
धडक इतकी जोरदार होती की फॉर्च्युनरचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर अडथळा बनून उभी राहिल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांना जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वळवण्यात आले. (Road Accident)
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. (Pune News)
या अपघातामुळे मिसिंग लिंक परिसरात सुमारे 2 ते 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहने हटवल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुंबईच्या दिशेने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. (Accident)
या प्रकरणी महामार्ग पोलीस पुढील तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. (Accident News)