जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या ‘आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वर्षाच्या शेवटी होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत ३ टी-२० सामन्यांचा समावेश केला आहे. या नव्या बदलांमुळे आता भारतीय महिला संघ यंदाच्या डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकूण ७ सामने खेळणार आहे. यामध्ये १ एकमेव कसोटी सामना, ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश असेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी नव्या वेळापत्रकाचे स्वागत केले. “भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तिन्ही प्रकारांत खेळल्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमच्या ‘प्रोटियाज’ संघाची सर्वोत्तम तयारी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
https://prahaar.in/2026/08/07/india-pakistan-clash-headlines-womens-asia-cup-2026-schedule/
एकमेव कसोटी सामना : ९ ते १२ डिसेंबर: सेंट जॉर्ज पार्क, गकेबेर्हा
https://prahaar.in/2026/08/07/ajinkya-rahanes-new-innings-no-coaching-or-commentary-after-retirement-now-he-will-take-up-this-major-role/
एकदिवसीय मालिका :
१ ला एकदिवसीय सामना: १६ डिसेंबर (बोलँड पार्क, पार्ल)
२ रा एकदिवसीय सामना: १९ डिसेंबर (न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केपटाऊन)
३ रा एकदिवसीय सामना: २२ डिसेंबर (मंगाउंग ओव्हल, ब्लोमफॉन्टेन)
https://prahaar.in/2026/08/07/shockwaves-in-pakistan-cricket-player-dealt-a-major-blow-handed-a-two-year-ban-and-a-fine-of-10-lakhs/
टी-२० मालिका :
१ ला टी-२० सामना: २६ डिसेंबर (विलोमूर पार्क, बेनोनी)
२ रा टी-२० सामना: २९ डिसेंबर (एनडब्ल्यूसी ओव्हल, पोचेफस्ट्रूम)
३ रा टी-२० सामना: ३० डिसेंबर (एनडब्ल्यूसी ओव्हल, पोचेफस्ट्रूम)