मुंबई : विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने अप्रेंटिसशिप भरतीची घोषणा केली आहे. AAI च्या पश्चिम विभागीय मुख्यालयामार्फत पदवीधर आणि डिप्लोमा धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणादरम्यान मासिक विद्यावेतनही मिळणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी पूर्व अनुभवाची आवश्यकता नसून फ्रेशर्सनाही अर्ज करता येणार आहे. (AAI Recruitment)
https://prahaar.in/2026/08/06/jalgaon-major-action-taken-in-the-jalgaon-bypass-case/
कुठे मिळणार प्रशिक्षण?
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, कोल्हापूर, जामनगर, जबलपूर, कांडला, भुज, दीव, गोंदिया, सोलापूर आणि पोरबंदर येथील AAI केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामध्ये विमानतळ संचालन, देखभाल आणि हवाई वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. ( Airport Authority of India)
पात्रता
• मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित शाखेतील चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी किंवा तीन वर्षांचा नियमित डिप्लोमा आवश्यक.
• उमेदवार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश किंवा दीव या पश्चिम विभागातील रहिवासी असावा.
• 31 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षांदरम्यान असावे.
• अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांसाठी 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू राहील.
मासिक विद्यावेतन
• पदवीधर अप्रेंटिस: ₹15,000 प्रति महिना
• डिप्लोमा अप्रेंटिस: ₹12,000 प्रति महिना
हे विद्यावेतन केंद्र सरकार आणि AAI यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया
• पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल.
• कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
• शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, मुलाखत (लागू असल्यास), वैद्यकीय तपासणी आणि पोलीस पडताळणी केली जाईल.
• अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल.
अर्जाची अंतिम तारीख
इच्छुक उमेदवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी NATS पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. भरती प्रक्रियेदरम्यान चुकीची किंवा खोटी माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( Govt Jobs India)