Home ताज्या घडामोडी Old Saree Reuse : फेकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! जुन्या साडीपासून बनवा घरासाठी ‘या’ 8 शानदार गोष्टी

Old Saree Reuse : फेकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! जुन्या साडीपासून बनवा घरासाठी ‘या’ 8 शानदार गोष्टी

0
Old Saree Reuse : फेकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! जुन्या साडीपासून बनवा घरासाठी ‘या’ 8 शानदार गोष्टी

तुमच्याही कपाटात जुन्या साड्या पडून आहेत का? त्या फेकून देण्याचा विचार करत असाल, तर आधी एकदा थांबा! कारण या जुन्या साड्यांपासून तुम्ही घराची शोभा वाढवणाऱ्या अनेक सुंदर आणि उपयुक्त वस्तू तयार करू शकता. आकर्षक कुशन कव्हर्स, पडदे, टेबल रनर, डोअर मॅट, शॉपिंग बॅग, फुलदाण्यांचे कव्हर, वॉल हॅंगिंग, स्टोरेज बास्केट आणि इतर अनेक क्रिएटिव्ह वस्तू अगदी कमी खर्चात बनवता येतात. यामुळे जुन्या साड्यांचा पुनर्वापर होतो, पैशांची बचत होते आणि घरालाही एक वेगळा, आकर्षक लूक मिळतो. तर चला, जुन्या साड्यांपासून तयार होणाऱ्या अशाच काही भन्नाट आणि सुंदर वस्तू पाहूया!

स्टायलिश कुशन कव्हर्स

जुन्या साडीच्या सुंदर डिझाइनचा वापर करून आकर्षक कुशन कव्हर्स तयार करा. घराचा लूक क्षणात बदलेल.

https://prahaar.in/2026/08/06/a-surefire-remedy-for-all-monsoon-related-ailments-easily-prepare-it-using-kitchen-ingredients/

 ट्रेंडी टोट बॅग

साडीच्या कापडापासून मजबूत आणि स्टायलिश शॉपिंग किंवा ऑफिस टोट बॅग शिवून घ्या.

 पडदे

सिल्क किंवा कॉटन साडीपासून सुंदर पडदे तयार करा. कमी खर्चात घराला नवा लूक मिळेल.

 टेबल रनर आणि मॅट्स

साडीच्या बॉर्डरचा वापर करून डायनिंग टेबलसाठी आकर्षक टेबल रनर आणि प्लेसमॅट्स बनवा.

लहान मुलांचे कपडे

मऊ कॉटन साडीपासून मुलांसाठी फ्रॉक, कुर्ता किंवा नाईटसूट तयार करता येतात.

गिफ्ट रॅप किंवा पोटली बॅग

पेपरऐवजी जुन्या साडीपासून सुंदर पोटली बॅग किंवा गिफ्ट रॅप तयार करा. पर्यावरणपूरक आणि आकर्षक पर्याय!

 पॅचवर्क ब्लँकेट किंवा रजई

अनेक जुन्या साड्यांचे तुकडे जोडून सुंदर पॅचवर्क ब्लँकेट किंवा रजई तयार करा.

स्टायलिश ड्रेस किंवा श्रग

आवडती जुनी साडी नव्या फॅशनमध्ये बदलून लॉन्ग श्रग, काफ्तान, कुर्ती किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेस तयार करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here