Home क्रीडा IPL Jos Buttler T20 Record : क्रिकेट जगतात जोस बटलरचा डंका! पोलार्डला पछाडत बनला T20 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

Jos Buttler T20 Record : क्रिकेट जगतात जोस बटलरचा डंका! पोलार्डला पछाडत बनला T20 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

0
Jos Buttler T20 Record : क्रिकेट जगतात जोस बटलरचा डंका! पोलार्डला पछाडत बनला T20 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) टी२० (T20) क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कीरॉन पोलार्डचा सर्वात मोठा विक्रम मोडीत काढत जोस बटलर आता टी२० क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा करणारा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. बुधवारी (५ ऑगस्ट) ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्स आणि वेल्श फायर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान बटलरने हा ऐतिहासिक टप्पा पार केला.

पोलार्डला टाकले मागे

सामन्यापूर्वी बटलरला पोलार्डचा १४,८०३ धावांचा जागतिक विक्रम मोडण्यासाठी केवळ २२ धावांची गरज होती. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बटलरने २० चेंडूंत नाबाद ५१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या खेळीदरम्यान ६२ व्या चेंडूवर धाव घेताच तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. बटलरचा हा ५२२ वा टी२० सामना होता. आता त्याच्या नावावर ४९२ डावांमध्ये १४,८३३ धावा जमा झाल्या आहेत.

https://prahaar.in/2026/08/06/rajpal-yadav-major-action-taken-by-the-bank-against-rajpal-yadav-his-assets-are-set-to-be-auctioned-following-a-cheque-bounce-case/

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे जगातील अव्वल फलंदाज

१. जोस बटलर: ५२२ सामने – १४,८३३* धावा

२. कीरॉन पोलार्ड: ७४६ सामने – १४,८०३ धावा

३. क्रिस गेल: ४६३ सामने – १४,५६२ धावा

४. ॲलेक्स हेल्स: ५२८ सामने – १४,४४९ धावा

५. डेव्हिड वॉर्नर: ४३९ सामने – १४,२८४ धावा

६. विराट कोहली: ४३० सामने – १४,२१८ धावा

७. जेम्स व्हिन्स: ४९१ सामने – १३,७७७ धावा

८. शोएब मलिक: ५५७ सामने – १३,५७१ धावा

९. क्विंटन डी कॉक: ४५२ सामने – १२,६५४ धावा

१०. रोहित शर्मा: ४७२ सामने – १२,५३१ धावा

पोलार्डने या वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिस गेलचा १४,५६२ धावांचा विक्रम मोडला होता, आता पोलार्डला मागे टाकत बटलर पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बटलरची दमदार कामगिरी

बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०२२ मध्ये ‘आयसीसी टी२० विश्वचषक’ जिंकला होता. त्याने आतापर्यंत १६० आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामन्यांमध्ये ४,२१२ धावा केल्या आहेत. तसेच जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या ‘आयपीएल’मध्ये (IPL) तो मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ७ शतके आणि २८ अर्धशतकांच्या मदतीने ४,६४६ धावा नोंद आहेत.

‘द हंड्रेड’ स्पर्धेतही विक्रमी कामगिरीचा धडाका

वेल्श फायरविरुद्धच्या सामन्यात बटलरच्या ५१ धावांच्या मदतीने मँचेस्टर सुपर जायंट्सने अवघ्या ६९ चेंडूंमध्ये १५६ धावांचे लक्ष्य एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. बटलरने या मोसमात मँचेस्टरसाठी ६ सामन्यांत ४ अर्धशतके झळकावली आहेत. चालू मोसमात २७७ धावांसह तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. एकाच मोसमात ४ वेळा ५० हून अधिक धावा करून त्याने डेव्हिड मलान आणि जेम्स व्हिन्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

जोस बटलरची वेगवेगळ्या टी२० लीगमधील एकूण कामगिरी :

T20Is (इंग्लंड): १६० सामने, ४,२१२ धावा

IPL (भारत): १३८ सामने, ४,६४६ धावा

व्हिटॅलिटी ब्लास्ट (इंग्लंड): ११५ सामने, २,६८८ धावा

द हंड्रेड (मँचेस्टर): ३१ सामने, १,१९२ धावा

SA20 (दक्षिण आफ्रिका): ३१ सामने, ९६९ धावा

बिग बॅश लीग (ऑस्ट्रेलिया): १८ सामने, ६०५ धावा

बांगलादेश प्रीमियर लीग: १४ सामने, २२५ धावा

चॅम्पियन्स लीग T20: ५ सामने, ५९ धावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here