Home ताज्या घडामोडी Clove water : स्वयंपाक घरातील हा पदार्थ पाण्यात मिसळा; २१ दिवसात चेहऱ्यावर फरक दिसेल

Clove water : स्वयंपाक घरातील हा पदार्थ पाण्यात मिसळा; २१ दिवसात चेहऱ्यावर फरक दिसेल

0
Clove water : स्वयंपाक घरातील हा पदार्थ पाण्यात मिसळा; २१ दिवसात चेहऱ्यावर फरक दिसेल
Lavang

पाण्यात कोणता पदार्थ मिसळावा आणि हे पाणी प्यायल्याने काय फायदा होईल जाणून घ्या.

तुम्हीसुद्धा चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि पोटाच्या समस्यांनी त्रस्त आहात? रोज सकाळी उपाशी पोटी लवंगाचे पाणी नियमित प्यायल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत मिळू शकते.
लवंगमध्ये ‘युजेनॉल’ नावाचा एक अतिशय शक्तिशाली नैसर्गिक घटक आढळतो. ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. याचा अर्थ असा की, हे थेट त्या बॅक्टेरियाशी लढते, जे चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास कारणीभूत असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम्ससारखे हे तुमच्या त्वचेच्या वरच्या थराला हानी पोहोचवत नाही.

Lavang Water :

प्रत्येक भारतीय घरामध्ये आढळणारे लवंग केवळ जेवणाचीच चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर मानले जाते. तुम्ही सुद्धा चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमांनी त्रस्त असाल, महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स आणि क्रीम्स वापरूनही बदलत दिसत नसेल तर लवंग तुमच्या खूप कामी येऊ शकते. फक्त तुम्हाला रोज रात्री दोन लवंग पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत आणि सकाळी उठून उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे. ऐकायला हा खूप साधा सोपा उपाय वाटतो, पण जेव्हा तुम्ही रोज याचा वापर कराल, तेव्हा याचे परिणाम पाहून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल.

21 Days Challenge :

कमीत कमी 21 दिवस सलग लवंगचे पाणी प्या. 21 दिवसांत तुम्हाला स्पष्ट फरक दिसून येईल.
लवंगच्या पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स हळूहळू कमी करण्यास मदत करते. नियमितपणे उपाशी पोटी लवंगचे पाणी प्यायलयास त्वचा निरोगी राहील.

निरोगी पोट :

आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आरोग्याचा आणि त्वचेचा थेट संबंध आपल्या पोटाशी असतो. जर तुमची पचनसंस्था व्यवस्थित नसेल किंवा पोटात बिघाड असेल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. लवंगचे पाणी शरीराची पचनप्रक्रिया सुधारते. जेव्हा पोट आतून स्वच्छ राहते, तेव्हा त्वचा आपोआप स्वच्छ आणि निरोगी दिसू लागते.

सर्दी-खोकला :

हवामानात बदल होताच सर्दी, ताप, खोकला, कोरडा खोकला, घशात खवखव, या समस्या सर्वात जास्त त्रास देतात. लवंगमध्ये असलेले गुणधर्म सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यास उपयुक्त ठरतात.

दातांचे आरोग्य :

दातदुखी, हिरड्यांमध्ये वेदना, हिरड्यांना सूज येणे अशा समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही लवंगचे पाणी पिऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here