Home देश Air India flight turbulence : हवेतील धक्क्यांमुळे एअर इंडियाचं विमान थेट खाली कोसळलं; १२ प्रवासी जखमी, दिल्लीत सुरक्षित लँडिंग

Air India flight turbulence : हवेतील धक्क्यांमुळे एअर इंडियाचं विमान थेट खाली कोसळलं; १२ प्रवासी जखमी, दिल्लीत सुरक्षित लँडिंग

0
Air India flight turbulence : हवेतील धक्क्यांमुळे एअर इंडियाचं विमान थेट खाली कोसळलं; १२ प्रवासी जखमी, दिल्लीत सुरक्षित लँडिंग

नवी दिल्ली : थायलंडच्या फुकेत शहरावरून दिल्लीकडे येणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानाला मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी हवेत अचानक मोठा धक्का (टर्ब्युलन्स) बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानाला मिळालेल्या या अचानक हादऱ्यामुळे विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या प्रकारात २ क्रू मेंबर्ससह एकूण १२ जण जखमी झाले आहेत, तर विमानाच्या अंतर्गत भागाचेही काही नुकसान झाले आहे.

अचानक विमानाची उंची घसरली!

या घटनेला अधिकृत दुजोरा देत एअर इंडियाने एक पत्रक जारी केले आहे. एअर इंडियानुसार, फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या ‘AI379’ या विमानाला उड्डाणादरम्यान अचानक तीव्र वाऱ्याच्या प्रवाहामुळे मोठा झटका बसला. यामुळे विमानाची उंची अचानक काही सेकंदांसाठी झपाट्याने खाली आली. सुदैवाने, वैमानिकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/08/04/bigg-boss-20-release-date-announced-salman-khan-promo-released/

विमानात १३४ प्रवासी; तातडीने वैद्यकीय उपचार

या विमानात एकूण १३४ प्रवासी प्रवास करत होते. एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. ज्या प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत, त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले असून तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

“माझे डोके थेट छताला आपटले…” – प्रवाशांनी सांगितला थरार

दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरल्यानंतर प्रवाशांनी हवेत घडलेला तो भीतीदायक प्रसंग सांगितला. विमानाची उंची अचानक खाली आल्यामुळे अनेक प्रवासी आपल्या सीटवरून वर फेकले गेले. एका प्रवाशाने सांगितले की, “अचानक विमान खाली गेले आणि माझे डोके थेट विमानाच्या छतावर जाऊन आपटले, त्यानंतर मी खाली पडलो.” या अचानक झालेल्या धक्क्यामुळे काही प्रवाशांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून काही जणांना खरचटले आहे.

एअर इंडियाचे स्पष्टीकरण आणि तपास सुरू

या घटनेनंतर एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, “प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रभावित प्रवाशांना आम्ही सर्व प्रकारची मदत पुरवत आहोत. या घटनेच्या चौकशीसाठी आम्ही संबंधित नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला पूर्ण सहकार्य करत आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here