Home देश Melody Tiramisu Flavour : ‘मेलोडी’चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या ‘त्या’ गिफ्टवरून पारलेने लाँच केला ‘Melody Tiramisu’!

Melody Tiramisu Flavour : ‘मेलोडी’चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या ‘त्या’ गिफ्टवरून पारलेने लाँच केला ‘Melody Tiramisu’!

0
Melody Tiramisu Flavour : ‘मेलोडी’चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या ‘त्या’ गिफ्टवरून पारलेने लाँच केला ‘Melody Tiramisu’!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील ‘मेलोडी’ (Melody) चा तो प्रसिद्ध किस्सा आता एका नव्या रूपात तुमच्या हातात येणार आहे! पारले (Parle) या भारतातील प्रसिद्ध कंपनीने ‘मेलोडी तिरामीसू’ (Melody Tiramisu) हा स्पेशल आणि लिमिटेड एडिशन (Limited Edition) फ्लेवर बाजारात लाँच केला आहे. दोन देशांच्या प्रमुखांमधील एका गोड प्रसंगाने प्रेरित होऊन पारलेने हा नवीन फ्लेवर आणला आहे.

मेलोडी टॉफी अन् तो व्हायरल किस्सा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर गेले असताना त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेट म्हणून ‘मेलोडी’ टॉफीचे पॅकेट दिले होते. ही भेट स्वीकारल्यानंतर मेलोनी यांनी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हातात मेलोडीचे पॅकेट धरून त्या हसत म्हणाल्या होत्या, “पंतप्रधान मोदींनी आम्‍हाला एक खूप छान टॉफी गिफ्ट दिली आहे, जिचं नाव मेलोडी आहे!” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मोदी आणि मेलोनी यांच्या नावावरून युजर्सनी #Melodi नावाचा ट्रेंड सुरू केला अन् त्यावर हजारो मीम्स (Memes) बनवले होते.

https://prahaar.in/2026/08/03/neet-ug-counselling-2026-schedule-announced-registration-to-begin-on-august-5/

पारलेने दिला इटालियन ट्विस्ट!

सोशल मीडियावरील हा व्हायरल ट्रेंड पाहून पारले कंपनीने या संधीचे सोने करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या जगप्रसिद्ध मेलोडी टॉफीमध्ये बदल करत तिला ‘तिरामीसू’ (Tiramisu) चा नवा फ्लेवर दिला आहे. ‘तिरामीसू’ हा इटलीतील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय गोड पदार्थ (Dessert) आहे. मेलोडीच्या नेहमीच्या चॉको-कॉफी फ्लेवरला इटालियन चव देऊन पारलेने भारत आणि इटलीच्या या मैत्रीला एक गोड श्रद्धांजली वाहिली आहे.

खास पॅकेजिंग आणि ‘फ्रेंडशिप डे’चे औचित्य

या नव्या मेलोडीच्या पॅकेटवर “Celebrating India-Italy Friendship” (भारत-इटलीच्या मैत्रीचा उत्सव) असा संदेश ठळकपणे छापण्यात आला आहे. पारलेने या खास टॉफीचे लाँचिंग २ ऑगस्ट म्हणजेच ‘फ्रेंडशिप डे’ च्या दिवशी केले, ज्यामुळे भारत-इटली मैत्रीचा हा मेसेज अधिकच खास बनला आहे.

कुठे अन् कशी मिळणार ही नवी मेलोडी ?

जर तुम्हाला हा नवीन इटालियन फ्लेवर ट्राय करायचा असेल, तर ही टॉफी सध्या फक्त ‘ब्लिंकइट’ (Blinkit) या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपवर उपलब्ध आहे. १८० ग्रॅमचे हे पॅकेट फक्त पुढील १ ते २ महिनेच (Limited-Edition) खरेदी करता येणार आहे. अनेक वर्षांपासून भारतीयांच्या जिभेवर असणारी मेलोडी आता केवळ एक टॉफी राहिलेली नसून, ती दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीचे प्रतीक बनली आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here