मुंबई : फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुदत ठेवींवरील व्याजदर आणि त्यासंबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात लागू होणार आहेत.
या बदलांमुळे FD वरील व्याजदर वाढणार किंवा कमी होणार नाहीत, मात्र व्याजदर निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि एकसमान होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही शाखेत समान मुदत आणि समान रकमेच्या FD वर एकच व्याजदर मिळेल. (FD New Rule)
FD गुंतवणूकदारांसाठी काय बदलणार?
व्याजदरांची माहिती होणार अधिक पारदर्शक :
नव्या नियमांनुसार, सर्व बँकांना FD आणि इतर ठेव योजनांचे व्याजदर आधीच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करणे बंधनकारक असेल. ग्राहकांना यामुळे विविध बँकांच्या व्याजदरांची सहज तुलना करता येईल आणि अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येईल. (FD New Rule)
https://prahaar.in/2026/08/01/new-gold-and-silver-rates-gold-prices-rose-on-the-very-first-day-of-august-check-the-latest-rates-for-gold-and-silver-in-your-city/
बल्क डिपॉझिटसाठीही बदल :
RBI ने मोठ्या रकमेच्या बल्क डिपॉझिट संदर्भातील नियमांमध्येही सुधारणा केली आहे. बँकांना बाजारातील परिस्थिती आणि निधी उभारणीच्या गरजेनुसार मोठ्या ठेवींवर स्वतंत्र व्याजदर निश्चित करण्याची मुभा असेल. ही सुविधा NRI रुपया ठेवींनाही लागू होणार आहे. (FD New Rule)
ऑक्टोबरपासून FD चे व्याज वाढणार का?
https://prahaar.in/2026/07/29/centre-imposes-restrictions-on-sugar-stocks-holding-stock-beyond-30-days-prohibited-maximum-limit-set-at-4000-quintals/
कोणत्या बँकांवर लागू होतील नवे नियम?
RBI चे हे नवे नियम देशातील जवळपास सर्व प्रमुख बँकिंग संस्थांवर लागू होणार आहेत. यात कमर्शियल बँका, स्मॉल फायनान्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB), लोकल एरिया बँका, पेमेंट बँका आणि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका यांचा समावेश आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी FD गुंतवणूकदारांना या बदलांचा लाभ मिळणार आहे. (FD New Rule)