Home क्रीडा Commonwealth Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा ऐतिहासिक पराक्रम; ९६ वर्षांत प्रथमच जिंकली ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके

Commonwealth Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा ऐतिहासिक पराक्रम; ९६ वर्षांत प्रथमच जिंकली ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके

0
Commonwealth Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा ऐतिहासिक पराक्रम; ९६ वर्षांत प्रथमच जिंकली ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके
Historic feat by Indian boxers; won 7 gold and 3 silver medals for the first time in 96 years.

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी दैदीप्यमान कामगिरी करत इतिहास रचला आहे. बॉक्सिंगच्या ९६ वर्षांच्या इतिहासात भारताने प्रथमच ७ सुवर्ण आणि ३ रौप्य अशी एकूण १० पदके आपल्या नावावर केली आहेत. ग्लासगो येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी अपेक्षेपेक्षा कितीतरी सरस कामगिरी करून दाखवली.

स्पर्धेच्या सुरुवातीला तज्ज्ञांच्या मनात धाकधूक होती. नेमबाजी, बॅडमिंटन आणि कुस्ती यांसारख्या भारताला नियमितपणे पदके मिळवून देणाऱ्या खेळांच्या अनुपस्थितीमुळे भारत पदक तालिकेत पिछाडीवर पडेल, अशी भीती वर्तवली जात होती. मात्र, भारतीय बॉक्सिंग, ज्युडो, पॅरा-ॲथलीट, ॲथलेटिक्स आणि वेटलिफ्टिंगमधील खेळाडूंच्या दमदार कामगिरीने भारताचे स्थान उंचावले.

https://prahaar.in/2026/08/02/patients-condition-stable-after-extremely-rare-surgery-at-rajawadi-hospital/

महिला आणि पुरुषांची सुवर्णमोहिमेवर पकड

या स्पर्धेत भारताकडून १४ बॉक्सर्सचा (७ पुरुष आणि ७ महिला) संघ सहभागी झाला होता. भारतीय बॉक्सिंग असोसिएशनला केवळ तीन सुवर्णपदकांची अपेक्षा होती, परंतु भारतीय खेळाडूंनी ही मजल दूर मागे टाकली. भारताच्या १४ पैकी तब्बल १० बॉक्सर उपांत्य फेरीत पोहोचले होते. बॉक्सिंग फेडरेशनचे महासचिव प्रमोद चौधरी यांनी आधीच जाहीर केले होते की सर्व दहा बॉक्सर अंतिम फेरीत पोहोचतील आणि खेळाडूंनी ते प्रत्यक्षात आणून दाखवले.

अंतिम फेरीत भारतीय महिला बॉक्सरनी ५ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकले. प्रीती पवार, जस्मिन, साक्षी, प्रिया घंगास आणि अरुंधती चौधरी यांनी सुवर्णपदकांवर नाव कोरले, तर आसामची ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिने रौप्य पदक पटकावले. पुरुषांच्या गटात सचिन आणि अंकुश यांनी सुवर्णपदक जिंकले, तर जादुमणी आणि ९०+ किलोग्राम गटात नरिंदरने रौप्यपदक मिळवून भारताचे १० वे पदक निश्चित केले.

https://prahaar.in/2026/08/01/public-works-minister-shivendrasinhraje-bhosale-inspected-palghar-which-has-been-battered-by-heavy-rainfall/

ऐतिहासिक प्रवासाचे टप्पे

भारताने १९३४ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, बॉक्सिंगमधील पहिले पदक जिंकण्यासाठी भारताला ६४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली; हे पदक १९९८ च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल खेळांत जितेंद्र कुमारने जिंकले होते. त्यानंतर ६८ वर्षांनी, २००२ च्या मँचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेत पश्चिम बंगालच्या अली कमरने भारताला बॉक्सिंगमधील पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले.

या २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील या १० विशेष पदकांच्या जोरावर, भारताने स्पर्धेच्या समाप्तीच्या एक दिवस आधी १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ८ कांस्य अशा एकूण ३८ पदकांसह पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. भारतीय बॉक्सर्सच्या या दैदीप्यमान यशाने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here