नवी दिल्ली : अमृतसर विरुद्ध तरन तारन मेन सिनिअर या स्थानिक सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर अभिषेक शर्मा अमृतसरकडून खेळत आहे. त्याने तरन तारन मेन सिनिअर विरुद्धच्या सामन्यात ९१ चेंडूत २३३ धावा केल्या. अभिषेकच्या फटकेबाजीमुळे अमृतसर संघाने तरन तारन मेन सिनिअर विरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत आठ बाद ५३३ धावा केल्या. अभिषेकने २५ षटकार आणि १५ चौकार मारत द्विशतकी खेळी केली. फक्त षटकार आणि चौकार मारत अभिषेक २१० धावा केल्या. अभिषेकसोबत सलामीला आलेल्या अभय चौधरीने ८५ चेंडूत २ षटकार आणि १० चौकारांच्या जोरावर ९३ धावा केल्या.
https://prahaar.in/2026/08/02/hardik-pandya-makes-a-major-decision-visits-tirupati-balaji-with-mahika-sharma/
सलामीवीरांच्या फटकेबाजीला अमृतसर संघातील अभिनव शर्माचीही छान साथ लाभली. अभिनवने ३३ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकार मारत ५१ धावा केल्या. वरिंदर सिंहने २९ चेंडूत ३६, सलिल अरोडाने १८ चेंडूत २९, साहिल शर्माने २० चेंडूत ३७, तरनवीर सिंहने १५ चेंडूत २० धावांचे योगदान दिले.
https://prahaar.in/2026/08/02/india-won-39-medals-at-the-glasgow-commonwealth-games-2026-the-closing-ceremony-will-feature-a-glimpse-of-ahmedabad-2030/
अमृतसर संघाच्या फलंदाजांनी षटकार चौकारांचा पाऊस पाडत मोठी धावसंख्या उभारली. यामुळे तरन तारन मेन सिनिअर संघावरील दबाव वाढला आहे.
https://prahaar.in/2026/08/02/duleep-trophy-2026-tilak-varma-big-responsibility-on-tilak-varmas-shoulders-captaincy-of-south-zone-in-the-duleep-trophy-karun-nair-also-gets-an-opportunity/
अभिषेक शर्मा मागील काही दिवसांपासून भारतासाठी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले आहेत. पण स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत त्यांनी आपल्या क्षमतेची झलक दाखवून दिली. द्विशतकी खेळीमुळे अभिषेक शर्माचा आत्मविश्वास बळावला आहे. यामुळे लवकरच होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा यांच्याकडून उत्तम खेळी होईल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.
https://prahaar.in/2026/08/02/india-ranks-fourth-in-the-medal-tally-with-39-medals-historic-performance-by-boxers-on-day-10/
अभिषेक शर्माची कामगिरी
- आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट – ५० सामने – १५५४ धावा – २ शतके आणि ११ अर्धशतके – घेतले ७ बळी
- टी ट्वेंटी क्रिकेट – १७१ सामने – ५०७० धावा – ८ शतके आणि २९ अर्धशतके – घेतले ५४ बळी
- IPL – ९२ सामने – २३७९ धावा – २ शतके आणि १३ अर्धशतके – घेतले ११ बळी