Home ब्रेकिंग न्यूज Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही, अध्यक्ष सदा सरवणकरांनी दिली माहिती

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही, अध्यक्ष सदा सरवणकरांनी दिली माहिती

0
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही, अध्यक्ष सदा सरवणकरांनी दिली माहिती

सिद्धिविनायक मंदिरातून दर्शनासाठी पैसे घेणारे ९ कर्मचारी बडतर्फ

मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर (Siddhivinayak Temple) न्यासामध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळा झालेला नाही, असा खुलासा न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला आहे. काही विश्वस्तांनी सरकारला दिलेल्या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असून, मंदिर न्यासाचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाविकांकडून दर्शनासाठी ऑनलाईन माध्यमातून पैसे घेणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

https://prahaar.in/2026/08/01/cctv-surveillance-at-garbage-prone-hotspots-in-mumbai-punitive-action-against-those-dumping-waste/

सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी १८ कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वस्तांच्या पत्राचा हवाला देत केला होता. यावर भाष्य करताना सरवणकर यांनी पत्रात चोरी किंवा घोटाळ्याचा कुठेही उल्लेख नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. मंदिर परिसरात राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे दानपेटीतील उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी दानपेटीत दरमहा ४० ते ४५ लाख जमा होत असत, मात्र गेल्या महिन्यात हे दान ९० ते ९८ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/08/01/konkan-railway-good-news-for-the-people-of-konkan-approval-granted-for-a-new-regular-express-train-from-csmt-to-sawantwadi-road-to-serve-passengers-soon/

दर्शनासाठी गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगताना सरवणकर म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ‘जीपे’द्वारे दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याचे लक्षात आल्यावर तातडीने १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तपासाअंती ९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, भटजींना भाविकांनी दिलेल्या दक्षिणेबाबत शासकीय नियमावली असून, ती रक्कम दानपेटीतच जमा करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here