Home ब्रेकिंग न्यूज Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

0
Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वेला (Kokan Railway) मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनुसार, गाडी क्रमांक १५०८७ (CSMT–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस) आणि गाडी क्रमांक १५०८८ (सावंतवाडी रोड–CSMT एक्स्प्रेस) या गाड्या दररोज धावणार आहेत. मात्र, या रेल्वेच्या प्रत्यक्ष उद्घाटनाची तारीख आणि वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. (Kokan Railway)

https://prahaar.in/2026/08/01/who-is-asmita-dey-first-ever-indian-judo-gold-win-in-glasgow-commomwealth-games/

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे निर्णय :

कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गावर वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. मात्र, उपलब्ध नियमित गाड्यांची संख्या कमी असल्याने जवळपास प्रत्येक गाडीत मोठी गर्दी पाहायला मिळते. यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, कोकण विकास समिती आणि महाराष्ट्र रेल्वे परिषद यांच्याकडून सातत्याने नव्या नियमित रेल्वेची मागणी केली जात होती. अखेर या मागणीची दखल घेत रेल्वे बोर्डाने नव्या एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. (Kokan Railway)

या स्थानकांवर मिळणार थांबा :

नवीन एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. (Kokan Railway)

https://prahaar.in/2026/08/01/record-number-of-health-facilities-inaugurated-across-the-state-on-independence-day/

कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण :

या निर्णयाचे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, “CSMT–सावंतवाडी रोड नियमित एक्स्प्रेसमुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. आता रेल्वे प्रशासनाने दादर–रत्नागिरी नियमित रेल्वेही सुरू करावी, अशी आमची अपेक्षा आहे.” नवीन एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्याने गणेशोत्सवाच्या आधीच कोकणातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता सर्वांचे लक्ष या रेल्वेच्या वेळापत्रक आणि पहिल्या प्रवासाच्या घोषणेकडे लागले आहे. (Kokan Railway)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here