Home ब्रेकिंग न्यूज Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू

0
Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू

– गृहराज्यमंत्री पंकज भोयर; महाराष्ट्रात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून तपास

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन उभारणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) (Cockroach Janata Party) या संघटनेला परदेशातून निधी (फॉरेन फंडिंग) मिळत असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्रात राज्य गृह विभाग आणि केंद्र स्तरावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडून तपास सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. त्यामुळे ही संघटना आता राज्य व केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://prahaar.in/2026/08/01/pm-narendra-modi-inaugurates-alluri-sitarama-raju-international-airport-in-andhra-pradesh-unveils-17900-crore-development-projects-video/

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ३५ दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान सीजेपीने (Cockroach Janata Party) नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आंदोलनासाठी सीजेपीला परदेशातून निधी पुरवला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची दखल घेत सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. परदेशी निधीचा वापर देश, राज्य किंवा समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जात असेल, तर अशा संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्र्यांनी दिला आहे.

https://prahaar.in/2026/08/01/minister-girish-mahajans-ultimatum-to-the-administration/

दरम्यान, या चौकशीवर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी सरकारला संशय असल्यास त्यांनी खुशाल चौकशी करावी, असे आव्हान दिले आहे. तर, परदेशी निधीचा वापर सकारात्मक कामांसाठी होत असल्यास स्वागतार्ह आहे, मात्र देशविरोधी किंवा समाजविघातक कृत्यांसाठी वापर होत असल्यास चौकशी अनिवार्य असल्याचे सांगत गृहराज्यमंत्र्यांनी इतरही संशयास्पद संस्थांचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here