Home देश Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

विशाखापट्टणम : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली ‘निपुण’ ही दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका 30 जुलै रोजी विशाखापट्टणम इथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या जहाजाची रचना आणि बांधणी ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’ (IRS) च्या नियमांनुसार करण्यात आली आहे. ‘निपुण’ हे नाव संस्कृतमधून घेण्यात आले असून, त्याचा अर्थ ‘विशिष्ट विषयात प्रवीण, सक्षम आणि जाणकार असलेली व्यक्ती’ असा होतो. नावाप्रमाणेच, ही युद्धनौका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून खोल समुद्रातल्या मोहिमा आणि बचाव कार्यासाठी सक्षम आहे.

https://prahaar.in/2026/07/31/hyderabad-case-registered-against-meta-india-head-and-social-media-accounts/

या जहाजावर अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणे बसवण्यात आली असून त्यात ‘खोल समुद्रात बुडी मारण्याची’ क्षमता आहे. समुद्रातल्या मोहिमांसाठी या नौकेवर एक साइड डायव्हिंग मंचही तयार करण्यात आला आहे. दूरसंचालित वाहनांमुळे डायव्हर्सवर देखरेख आणि सुटका मोहिमा सुलभ होऊन जहाजाच्या परिचालन क्षमता आणखी वाढतात. याव्यतिरिक्त, पाणबुडीमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हे जहाज ‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसेल’ (DSRV) साठी ‘मदर शिप’ म्हणूनही काम करेल.

https://prahaar.in/2026/07/31/sanjay-raut-is-not-in-a-position-to-speak-about-amit-shah/

सुमारे 75 टक्के स्वदेशी सामग्रीसह ‘आत्मनिर्भर भारत’ या सरकारच्या संकल्पनेला पाठबळ देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या वाटचालीतील ‘निपुण’ चे वितरण हा आणखी एक मैलाचा दगड आहे. या नौकेच्या समावेशामुळे खोल समुद्रातील मोहिमांच्या विशिष्ट क्षेत्रात भारतीय नौदलाची क्षमता बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here