Home ब्रेकिंग न्यूज BMC : धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना तातडीने सुरू करा

BMC : धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना तातडीने सुरू करा

BMC : धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना तातडीने सुरू करा
BMC

महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे यांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) दिव्यांग पेन्शन योजनेचे अर्थसहाय्य तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्याकडे केली आहे.

सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात सुमारे ३२ कोटी रुपयांची तरतूद असूनही प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आलेला नाही. तसेच सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी ती लाभार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत या पेन्शन योजनेचा लाभ त्वरीत दिव्यांग व्यक्तींना देण्यात यावा अशी आग्रही मागणी केली आहे.

https://prahaar.in/2026/07/31/bmc-news-who-doesnt-want-scorpio-cars-who-wants-an-innova/

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात मीनल तुर्डे यांनी नमूद केले आहे की, दिव्यांग व्यक्तींच्या देखभालीसाठी, वैद्यकीय उपचारांसाठी, औषधोपचार, शिक्षण तसेच दैनंदिन गरजांसाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. अनेक कुटुंबांमध्ये एका व्यक्तीला दिव्यांग सदस्याच्या सेवेसाठी घरीच राहावे लागते. त्यामुळे अशा कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, महानगरपालिकेच्या दिव्यांग पेन्शन योजनेद्वारे त्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील वर्षापासून या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळालेले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सन २०२५-२६ मधील थकीत हप्ते आणि २०२६-२७ मधील नियमित पेन्शन देण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here