‘Made by Google’ इव्हेंटपूर्वी Pixel 11, Pixel 11 Pro आणि Pixel 11 Pro XL च्या किंमती आणि फीचर्सची माहिती लीक
मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या ‘Made by Google’ इव्हेंटमध्ये Google आपल्या बहुप्रतीक्षित Pixel 11 सीरिज लाँच करणार आहे. लाँचपूर्वीच या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या किंमती, स्टोरेज आणि बॅटरीसंबंधी महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. यंदा Pixel 11 सीरिजमध्ये Pixel 11, Pixel 11 Pro, Pixel 11 Pro XL आणि Pixel 11 Pro Fold असे चार मॉडेल्स सादर होण्याची शक्यता आहे. (Google Pixel 11)
किंमत काय असेल ?
समोर आलेल्या माहितीनुसार, यंदा Google आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करू शकते. Pixel 11 ची यूकेमधील सुरुवातीची किंमत 879 GBP (सुमारे 1.12 लाख रुपये) असू शकते. मागील वर्षी Pixel 10 हा 799 GBP मध्ये लाँच झाला होता. मात्र, Pixel 11 यंदा 128GB ऐवजी थेट 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/07/27/whatsapp-chats-to-get-a-new-look-an-update-featuring-an-attractive-design-for-iphone-users-is-coming-soon/
त्याचप्रमाणे Pixel 11 Pro ची सुरुवातीची किंमत 1,079 GBP (सुमारे 1.37 लाख रुपये), तर Pixel 11 Pro XL ची किंमत 1,279 GBP (सुमारे 1.65 लाख रुपये) असू शकते. म्हणजेच मागील पिढीच्या तुलनेत प्रत्येक मॉडेलची किंमत सुमारे 10 ते 15 हजार रुपयांनी वाढू शकते.
यंदा Google 128GB स्टोरेज व्हेरिएंट बंद करून सर्व मॉडेल्स 256GB पासून सुरू करणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे किंमत वाढली असली तरी ग्राहकांना अधिक स्टोरेज मिळणार आहे.
बॅटरीमध्ये अपग्रेड होणार नाही का?
बॅटरीबाबतही काही माहिती समोर आली आहे. Pixel 11 मध्ये 4985mAh, Pixel 11 Pro मध्ये 4850mAh आणि Pixel 11 Pro XL मध्ये 5115mAh बॅटरी दिली जाऊ शकते. काही मॉडेल्समध्ये मागील सीरिजच्या तुलनेत बॅटरी क्षमतेत किंचित घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, ही सर्व माहिती लीक झालेली असून, Google कडून अधिकृत घोषणा ‘Made by Google’ इव्हेंटमध्येच होणार आहे. त्यामुळे अंतिम किंमत आणि फीचर्समध्ये काही बदल होऊ शकतात.