Home देश Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती

Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती

0
Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती
2026 Kanwar Yatra begins

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शिवभक्तांच्या आतुरतेने वाट पाहिली जाणारी कावड यात्रा (Kanwar Yatra 2026) आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, आजपासूनच पवित्र श्रावण महिन्याची देखील सुरुवात होत आहे. यात्रेचा आरंभ होत असतानाच सर्वत्र ‘बोल बम’ आणि ‘हर हर महादेव’ असा जयघोष दुमदुमून निघाला आहे. हरिद्वार आणि देशातील इतर प्रमुख गंगा घाटांवरून पवित्र गंगाजल भरून लाखो शिवभक्त आपापल्या गावातील वा शहरातीस शिवमंदिरांकडे पायी प्रवासाला निघाले आहेत. या संपूर्ण यात्रेदरम्यान देशभरात अत्यंत भक्तीमय, सेवाभावी आणि आदराचे वातावरण पाहायला मिळत आहे.

https://prahaar.in/2026/07/30/india-registers-strong-objection-to-the-term-pakistan-kashmir-in-an-american-newspaper/

कावड यात्रा कधी संपणार आणि जलाभिषेक कधी?

ही पवित्र कावड यात्रा आगामी मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी समाप्त होईल. विशेष म्हणजे, याच दिवशी श्रावण शिवरात्री (Sawan Shivratri) देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. आपली खडतर पायी यात्रा पूर्ण केल्यानंतर, सर्व कावडयात्रेकरू या दिवशी भगवान शिवाला गंगाजल अर्पण करून जलाभिषेक करतील. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण शिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शिवाला जल अर्पण केल्याने भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

https://prahaar.in/2026/07/30/a-covert-war-is-underway-to-hollow-out-india-from-within-chief-minister-devendra-fadnavis/

कावड यात्रा काढण्यामागची श्रद्धा आणि महत्त्व

कावड यात्रा ही भगवान शिवाला समर्पित असलेली हिंदू धर्मतील सर्वात मोठ्या आणि पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. यामध्ये भक्त गंगा नदीतून पवित्र जल कलशात भरून खांद्यावर कावड ठेवून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या स्थानिक शिवमंदिरात शिवलिंगाला अभिषेक करतात. काही भाविक आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, काही उत्तम आरोग्यासाठी तर अनेकजण विशेष इच्छापूर्तीसाठी हा कठीण प्रवास करतात. या संपूर्ण प्रवासात सर्व भक्त अतिशय साधे जीवन जगतात आणि सतत भगवान शिवाच्या नावाचा नामजप करत पूर्ण भक्तिभावाने मार्गक्रमण करतात.

https://prahaar.in/2026/07/30/do-you-eat-colourful-fryums-papads-tamil-nadu-food-department-issues-health-warning/

कावड यात्रेचे प्रमुख प्रकार

प्रत्येक शिवभक्त आपापल्या श्रद्धेनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने कावड यात्रा पूर्ण करतो. यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात:

नियमित कावड: यात भक्त वाटेत थोडी विश्रांती घेत आणि चालत आपला प्रवास पूर्ण करतात.

डाक कावड: हा प्रकार थोडा वेगळा असून यामध्ये भक्त कुठेही न थांबता किंवा साखळी पद्धतीने अहोरात्र चालून आपला प्रवास वेळेत पूर्ण करतात.

दांडी कावड: हा कावड यात्रेचा सर्वात कठीण आणि कठोर प्रकार मानला जातो, ज्यामध्ये भक्त रस्त्यावर साष्टांग नमस्कार करत अत्यंत धीम्या गतिने आणि कष्टाने संपूर्ण अंतर पार करतात.

https://prahaar.in/2026/07/30/hockey-india-clarifies-the-controversy-over-the-hockey-jerseys-color-the-indian-team-will-appear-in-saffron-for-the-2026-world-cup/

प्रवासाला जाण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही पहिल्यांदाच कावड यात्रेला जाण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. सर्वात आधी आपल्या प्रवासाचा मार्ग निश्चित करा आणि तिथल्या हवामानाची अचूक माहिती मिळवून ठेवा. प्रवासादरम्यान नेहमी हलके आणि आरामदायक कपडे घाला, आवश्यक ती सर्व प्रथमोपचार औषधे सोबत ठेवा आणि शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) कायम टिकवून ठेवा. यात्रेदरम्यान स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा तसेच विश्रांतीसाठी प्रशासनाने जिथे अधिकृत शिबिरे उभारली आहेत, तिथेच मुक्काम करा, जेणेकरून प्रवास सुरक्षित होईल.

(टिप: ही सर्व माहिती उपलब्ध धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here