Home ब्रेकिंग न्यूज Mumbai News : कित्येक वर्ष टीबी आणि दमा समजून उपचार पण …; १० वर्षांच्या मुलीला मिळाले नवे जीवन

Mumbai News : कित्येक वर्ष टीबी आणि दमा समजून उपचार पण …; १० वर्षांच्या मुलीला मिळाले नवे जीवन

0
Mumbai News : कित्येक वर्ष  टीबी आणि दमा समजून उपचार पण …; १० वर्षांच्या मुलीला मिळाले नवे जीवन
health

मुंबई : एखाद्या आजाराचे योग्य वेळी आणि अचूक निदान किती महत्त्वाचे असते, याचे उदाहरण मुंबईतील धारावी येथे समोर आले आहे. सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १० वर्षांच्या मुलीवर तब्बल ७ वर्षे टीबी आणि नंतर दम्याचे उपचार सुरू होते. मात्र, अनेक वर्षे औषधे घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने करण्यात आलेल्या सखोल तपासणीत तिच्या फुफ्फुसात पेनाचे टोपण अडकले असल्याचे उघड झाले.

https://prahaar.in/2026/07/29/birth-and-death-registration-rules-set-to-become-stricter-will-court-permission-be-required-for-registration-after-two-years/

लहानपणापासूनच या मुलीला वारंवार खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत संसर्गाची लक्षणे दिसत होती. सुरुवातीला डॉक्टरांनी क्षयरोगाचा संशय घेत उपचार सुरू केले. त्यानंतरही प्रकृती सुधारली नाही म्हणून दम्याची औषधे दिली गेली. मात्र सात वर्षे उपचार करूनही त्रास कायम राहिल्याने पालकांनी अखेर तिला विशेष बाल रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात सीटी स्कॅन(CityScan) आणि ब्रॉन्कोस्कोपी(bronchoscopy) केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. तपासणीत मुलीच्या डाव्या फुफ्फुसाच्या श्वासनलिकेत अत्यंत खोलवर पेनाचे प्लास्टिकचे टोपण अडकले असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यामुळे एक फुफ्फुस आकुंचन पावले होते आणि सतत संसर्ग होत होता.
यानंतर फुफ्फुसरोगतज्ज्ञ(Pulmonologist), नाक-कान-घसा (ENT- Ear, Nose, and Throat) तज्ज्ञ आणि ॲनेस्थेशिया विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून ब्रॉन्कोस्कोपीद्वारे(bronchoscopy) पेनाचे टोपण यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती झपाट्याने सुधारली असून तिला नवजीवन मिळाले आहे.

या प्रकरणातील डॉक्टरांच्या मते, ही अत्यंत दुर्मिळ घटना असून परकीय वस्तू श्वासनलिकेत अतिशय खोलवर अडकल्यामुळे सुरुवातीला तिचे निदान करणे अवघड झाले. त्यामुळे लक्षणांवर आधारित उपचार सुरू राहिले. फुफ्फुसरोगतज्ज्ञ(Pulmonologist) डॉ. इंदू खोसला यांनी सांगितले की, दीर्घकाळ बरा न होणारा न्यूमोनिया(Pneumonia) किंवा सततचा संसर्ग दिसल्यास अनेकदा क्षयरोगाचा संशय घेतला जातो. मात्र अशा रुग्णांमध्ये आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन(CityScan) आणि ब्रॉन्कोस्कोपीसारख्या(bronchoscopy)तपासण्या वेळेवर केल्यास अशा दुर्मिळ कारणांचाही शोध लागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here