Home ताज्या घडामोडी Ramayan Movie : रामभक्तांची प्रतीक्षा संपली! ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जाहीर

Ramayan Movie : रामभक्तांची प्रतीक्षा संपली! ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जाहीर

0
Ramayan Movie : रामभक्तांची प्रतीक्षा संपली! ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जाहीर
Ramayan 2

मुंबई:
रणबीर कपूर आणि यश यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ या महाकाय चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. याआधी २४ जुलै रोजी रिलीज होणारा ट्रेलर(Trailer)  काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, निर्मात्यांनी आता अधिकृत घोषणा करत ट्रेलरच्या प्रदर्शनाची नवीन तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.

ट्रेलर रिलीजचा ब्रह्ममुहूर्त:

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रामायण’ चित्रपटाचा(Movie) अधिकृत ट्रेलर ३० जुलै २०२६ रोजी गुरुवारी पहाटे ४:१५ वाजता म्हणजेच अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या ब्रह्ममुहूर्तावर जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
“आम्ही ३० जुलै २०२६, गुरुवारी पहाटे ४:१५ वा. या ब्रह्ममुहूर्तावर जगभरात ‘रामायण’च्या ट्रेलरद्वारे या महाकाव्याचा उदय साजरा करणार आहोत.” असे निर्मात्यांनी म्हटले आहे.

https://prahaar.in/2026/07/29/shocking-incident-in-nagpur-bloody-attack-over-old-dispute-three-attacked-with-sword-and-knife-after-entering-house/

ट्रेलरचे प्रदर्शन का पुढे ढकलण्यात आले?

प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागे देशातील विद्यार्थी आंदोलन आणि सोनी पिक्चर्ससोबत झालेली जागतिक वितरण भागीदारी ही प्रमुख कारणे होती. निर्माते नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटसोबतच्या भागीदारीमुळे हा चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या हॉलीवूड चित्रपटाप्रमाणे ‘रामायण’ जगभरात भव्य पद्धतीने प्रदर्शित केले जाणार आहे. याच महत्त्वाच्या घडामोडींमुळे ट्रेलरचे लाँच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

https://prahaar.in/2026/07/29/promoting-development-based-on-transferable-development-rights-tdr/

४,००० कोटींचे बजेट:

‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. चित्रपटाचे एकूण बजेट(Budget) सुमारे ५०० मिलियन डॉलर्स म्हणजेच ४,००० कोटी रुपयांहून अधिक आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांच्या मते, सहा-सात वर्षांपूर्वी जेव्हा या चित्रपटाची योजना आखली जात होती, तेव्हा अनेकांनी यावर अविश्वास दाखवला होता. परंतु, हॉलीवूडच्या मोठमोठ्या चित्रपटांना टक्कर देईल अशा दर्जाची निर्मिती भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रपटासाठी केली जात आहे.

स्टारकास्ट आणि प्रदर्शनाचे नियोजन:

या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

भगवान श्रीराम: रणबीर कपूर

माता सीता: साई पल्लवी

हनुमान: सनी देओल

लक्ष्मण: रवी दुबे

रावण: यश

चित्रपटाचा पहिला भाग ऑक्टोबर २०२६ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज(release) केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here