Home महत्वाची बातमी Japan : जपान मध्ये कचरा टाकणे UPSC पेक्षाही कठीण; भारतीय महिलेचा अनुभव ,जपानची अनोखी व्यवस्था पाहून भारतीय महिला चक्रावली

Japan : जपान मध्ये कचरा टाकणे UPSC पेक्षाही कठीण; भारतीय महिलेचा अनुभव ,जपानची अनोखी व्यवस्था पाहून भारतीय महिला चक्रावली

0
Japan : जपान मध्ये कचरा टाकणे UPSC पेक्षाही कठीण; भारतीय महिलेचा अनुभव ,जपानची अनोखी व्यवस्था पाहून भारतीय महिला चक्रावली
japan garbage system

जपान : स्वच्छतेबाबत जगभरात जपानचं नाव आदराने घेतलं जातं. तिथे स्वच्छता ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याच शिस्तीचा अनुभव सांगणारा जपानमध्ये(Japan) वास्तव्यास असलेल्या एका भारतीय महिलेचा व्हिडीओ(Video) सध्या सोशल मीडियावर(Social Media)मोठ्या प्रमाणात व्हायरल(viral) होत आहे. “जपानमध्ये कचरा टाकणं म्हणजे UPSC परीक्षा पास करण्याइतकंच कठीण आहे,” असं ती गंमतीत म्हणताना दिसते.

https://prahaar.in/2026/07/29/parliament-monsoon-session-2026-day-8-live-updates-anti-exam-paper-leak-law-to-be-presented-today/

महिलेच्या म्हणण्यानुसार, जपानमध्ये कोणताही कचरा मनमानी पद्धतीने टाकता येत नाही. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र वर्गीकरण, स्वतंत्र कचरापेटी आणि स्वतंत्र दिवस निश्चित केलेले असतात. त्यामुळे कोणती वस्तू कोणत्या दिवशी टाकायची, याची माहिती असणं प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असतं.उदाहरणार्थ, प्लास्टिकची बाटली (Plastic Bottle) टाकण्यापूर्वी तिचं झाकण, प्लास्टिकचं लेबल(plastic Label) आणि झाकणाखालची प्लास्टिकची रिंग(Plastic Ring) वेगळी काढावी लागते. त्यानंतर बाटली स्वच्छ पाण्याने धुवून प्रत्येक भाग संबंधित कचरापेटीत टाकावा लागतो. या प्रक्रियेत चूक झाल्यास संबंधित व्यक्तीला दंडालाही(Fine) सामोरं जावं लागू शकतं.

भारतात(India) अजूनही अनेक ठिकाणी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती सुरू असताना, जपानमध्ये(Japan) कचरा व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे राबवलं जातं. त्यामुळे तिथले रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि परिसर कायम स्वच्छ दिसतात. भारतीय महिलेचा हा अनुभव सोशल मीडियावर(Social Media) चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांनी जपानच्या शिस्तीचं कौतुक करत भारतातही अशीच प्रभावी कचरा व्यवस्थापन व्यवस्था असावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here