नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी कायम असून मंगळवारी भारतीय खेळाडूंनी आणखी दोन रौप्यपदकांची भर घालत देशाची पदकसंख्या १२ वर नेली. वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौर आणि अॅथलेटिक्समध्ये गुलवीर सिंह यांनी शानदार कामगिरी करत भारताला प्रत्येकी एक रौप्यपदक मिळवून दिले. (Commonwealth Games 2026)
महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत हरजिंदर कौर हिने एकूण २२७ किलो वजन उचलत रौप्यपदकावर नाव कोरले. तिच्या दमदार कामगिरीमुळे भारताच्या पदकतालिकेत आणखी एका मौल्यवान पदकाची भर पडली. (Commonwealth Games 2026)
https://prahaar.in/2026/07/29/fast-bowler-justin-greaves-historic-feat-yet-the-62-year-old-world-record-held-by-the-marathi-cricketer-bapu-nadkarni-remains-unbroken-to-this-day/
त्यानंतर अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत गुलवीर सिंह याने उत्कृष्ट धाव घेत रौप्यपदक पटकावले. संपूर्ण शर्यतीत त्याने सातत्यपूर्ण वेग राखत भारताला दिवसातील दुसरे रौप्य मिळवून दिले. या दोन यशस्वी कामगिरीनंतर भारताच्या खात्यात आता एकूण १२ पदके जमा झाली आहेत. त्यामध्ये २ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. सध्या भारत पदकतालिकेत नवव्या स्थानावर असून आगामी स्पर्धांमध्ये आणखी पदके मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. (Commonwealth Games 2026)
https://prahaar.in/2026/07/29/team-india-t-dilips-sudden-exit-who-has-joined-team-india/