Home देश India on POK Election : PoK निवडणुकांवर भारताचा पाकिस्तानला खरमरीत इशारा! ‘हा बेकायदेशीर ताबा लपवण्याचा केवळ बनाव’

India on POK Election : PoK निवडणुकांवर भारताचा पाकिस्तानला खरमरीत इशारा! ‘हा बेकायदेशीर ताबा लपवण्याचा केवळ बनाव’

0
India on POK Election : PoK निवडणुकांवर भारताचा पाकिस्तानला खरमरीत इशारा! ‘हा बेकायदेशीर ताबा लपवण्याचा केवळ बनाव’

नवी दिल्ली : पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये आयोजित केलेल्या कथित विधानसभा निवडणुकांवर भारताने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. या निवडणुकांचा भारताने तीव्र निषेध करत, हा संपूर्ण प्रकार पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याला वैधतेचा आभास निर्माण करण्याचा निष्फळ प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे. (India on POK Election)

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीर आणि लडाखसह संपूर्ण केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अविभक्त भाग असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

https://prahaar.in/2026/07/29/personnel-of-the-anti-narcotics-task-force-to-receive-a-30-incentive-allowance-home-departments-decision/

‘निवडणुका म्हणजे केवळ दिखावा’ :

रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून घेतल्या जाणाऱ्या कथित विधानसभा निवडणुका या लोकशाही प्रक्रियेचा भाग नसून, त्या केवळ एक “दिखावा आणि बनाव” आहेत. या माध्यमातून पाकिस्तान त्या प्रदेशावरील आपला बेकायदेशीर ताबा लपवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आरोप केला की, पाकिस्तान या निवडणुकांच्या आडून त्या भागातील मानवाधिकारांचे उल्लंघन, नागरिकांवरील दडपशाही आणि लोकशाही हक्कांचे हनन यांसारख्या गंभीर प्रश्नांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. (India on POK Election)

‘PoK मधील आंदोलने पाकिस्तानच्या धोरणांचेच परिणाम’ :

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली आंदोलने ही तेथील नागरिकांच्या असंतोषाचे प्रतीक आहेत. आर्थिक शोषण, विकासाचा अभाव, मूलभूत अधिकारांचे हनन आणि प्रशासकीय दडपशाही यामुळे तेथील नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. (India on POK Election)

https://prahaar.in/2026/07/29/sharif-loses-sleep-over-this-demand-from-pakistans-gen-z/

भारताची भूमिका कायम :

भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीर कब्जा संपवून तो भाग रिकामा करावा. तसेच, त्या प्रदेशात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निवडणुका किंवा राजकीय प्रक्रिया भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम करू शकत नाहीत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले. भारताची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कथित निवडणुकांना भारताने कोणतीही वैधता मान्य नसल्याचे पुन्हा अधोरेखित करण्यात आले. (India on POK Election)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here