Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : ‘गज्वा-ए-हिंद’चे प्रयत्न करणाऱ्यांना मोदी सरकार सोडणार नाही!

Nitesh Rane : ‘गज्वा-ए-हिंद’चे प्रयत्न करणाऱ्यांना मोदी सरकार सोडणार नाही!

0
Nitesh Rane : ‘गज्वा-ए-हिंद’चे प्रयत्न करणाऱ्यांना मोदी सरकार सोडणार नाही!

 मंत्री नितेश राणे यांचा इशारा; ‘सर तन से जुदा’, ‘अल्ला हू अकबर’चा ‘नीट’शी काय संबंध?

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’विषयी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन देशात ‘गज्वा-ए-हिंद’ घडवण्याचे मोठे षड्यंत्र आखले जात असल्याचा आरोप मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. “विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मातीत मिळवून टाकू. पाकिस्तान किंवा मध्य पूर्वेतील देशांमध्ये बसून भारताविरोधात कट रचणाऱ्या एकालाही केंद्र व राज्य सरकार सोडणार नाही,” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

 

https://prahaar.in/2026/07/28/ind-vs-sl-bcci-announces-the-indian-squad-for-the-sri-lanka-tour-this-player-has-been-included-in-the-team/

महाराष्ट्र सायबर विभागाने ‘नीट’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चालवल्या जाणाऱ्या ५०० हून अधिक संशयित आणि परदेशी सोशल मीडिया अकाऊंट्सचा पर्दाफाश केल्यानंतर नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर आणि असामाजिक घटकांवर जोरदार निशाणा साधला. राणे म्हणाले, “महाराष्ट्र सायबर सेलच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की जिहादी घटकांना या आंदोलनाच्या आडून ‘गज्वा-ए-हिंद’चे उद्दिष्ट गाठायचे होते. जर हे आंदोलन ‘नीट’ परीक्षेबाबत होते, तर मग तिथे ‘सर तन से जुदा’च्या घोषणा का दिल्या गेल्या? आमच्या हिंदू-सनातन धर्माला आणि देवी-देवतांना शिवीगाळ का करण्यात आली? ‘सर तन से जुदा’ किंवा ‘अल्ला हू अकबर’ या घोषणांचा ‘नीट’ परीक्षेशी काय संबंध आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली असून त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. मात्र आंदोलनाच्या नावाखाली देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/07/28/sugar-price-hike-sugar-prices-hit-a-new-peak-rates-likely-to-soar-further/

विरोधकांच्या मौनावर टीका

शिवाजी पार्क येथील आंदोलनात सहभागी झालेल्या राजकीय नेत्यांवर टीका करताना राणे म्हणाले, “त्या मंचावर सनातन हिंदू धर्माचा अपमान केला जात असताना एकही नेता त्याविरोधात बोलला नाही. हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणाऱ्या नेत्यांचे हे कृत्य नक्कीच समर्थनार्ह नाही. पाकिस्तानच्या भूमीवरून किंवा इतर देशांतून भारताची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हुडकून काढून कडक कारवाई केली जाईल”, असा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here