Home ताज्या घडामोडी AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

0
AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे
allu arjun

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते जितके मोठे सुपरस्टार आहेत, तितकेच मोठ्या मनाचे व्यक्तिमत्त्वही आहेत. यावेळी AAFA वार्षिक समिट २०२६ मध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी विमा(Insurence) संरक्षणाची घोषणा केली. मात्र, या कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेल्या एका छोट्याशा कृतीने सर्वांची मने जिंकली. एका चाहत्याने त्यांना श्री जगन्नाथांची मूर्ती भेट दिली असता, ती स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपले पादत्राणे काढले.

https://prahaar.in/2026/07/28/do-not-recover-loans-of-up-to-%e2%82%b92-lakh-from-farmers/

आयकॉन स्टारने AAFA सदस्यांसाठी विमा संरक्षण योजना सुरू केली. त्यानिमित्ताने AAFA वार्षिक समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १०० हून अधिक सदस्यांसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि ओडिशा येथील प्रतिनिधी सहभागी झाले होते. याच वेळी एका चाहत्याने श्री जगन्नाथांची मूर्ती त्यांना भेट दिली. ती स्वीकारण्यापूर्वी अल्लू अर्जुन यांनी आदरपूर्वक आपले पादत्राणे काढले आणि नंतर मूर्ती स्वीकारली. त्यांच्या या छोट्याशा कृतीतून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि लोकांच्या भावनांबद्दलचा आदर पुन्हा एकदा स्पष्ट झाला.

फॅन्सकडून मिळालेल्या भरभरून प्रेमाबद्दल अल्लू अर्जुन यांनी एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले:

“माझ्या प्रिय चाहत्यांनो…

तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणांहून या कार्यक्रमासाठी आलात, हे पाहून मन खरंच आनंदाने भरून आलं. तुमच्या प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी स्वतःला खूप भाग्यवान आणि नम्र समजतो. पुढेही अशीच कामगिरी करत राहीन, ज्यामुळे तुम्हा सर्वांना माझा आणखी अभिमान वाटेल. “

कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक सदस्याला अल्लू अर्जुन यांच्यासोबत वैयक्तिक छायाचित्र काढण्याची संधी देण्यात आली. त्यांनी तब्बल चार ते पाच तास चाहत्यांशी संवाद साधला, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. याशिवाय सर्वांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमातून अल्लू अर्जुन आणि त्यांच्या चाहत्यांमधील अतूट नातं पुन्हा एकदा सिध्द झाले.

https://prahaar.in/2026/07/28/anushka-and-virat-kohli-have-purchased-a-house-worth-%e2%82%b918-29-crore-the-sea-is-visible-from-the-balcony/

विमा संरक्षण उपलब्ध करून देणे, चाहत्यांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांचे आदरातिथ्य करणे हे केवळ औपचारिकतेसाठी नव्हते, तर त्यांच्या मनापासूनच्या सन्मानाचे आणि आपुलकीचे प्रतीक होते. या विचारातून अल्लू अर्जुन यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक समर्पित फॅन कम्युनिटीसोबतचे आपले नाते आणखी घट्ट केले आहे.

दरम्यान, अल्लू अर्जुन यांनी त्यांच्या आगामी ‘राका’ या चित्रपटाची घोषणा करताच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ त्यांच्या नव्या लूकचा पोस्टर समोर येताच देशभरात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि तो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कॅरेक्टर रिव्हील्सपैकी एक ठरला. आता प्रेक्षक त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here