Home ब्रेकिंग न्यूज Paach Futaacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कीर्तनकार कन्येची गोष्ट लवकरच आपल्या भेटीला ; आषाढी एकादशी दिवशी पोस्टर आउट!

Paach Futaacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कीर्तनकार कन्येची गोष्ट लवकरच आपल्या भेटीला ; आषाढी एकादशी दिवशी पोस्टर आउट!

0
Paach Futaacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कीर्तनकार कन्येची गोष्ट लवकरच आपल्या भेटीला ; आषाढी एकादशी दिवशी पोस्टर आउट!
paach futacha bachhan

मुंबई : नाटकाचे रुपांतर चित्रपटात होण्याच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका नव्या सिनेमाचे नाव जोडले गेले आहे. लोकप्रिय ठरलेले एकपात्री प्रयोगशील नाटक ‘पाच फुटाचा बच्चन’ आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

कीर्तन परंपरा आणि विठ्ठल भक्तीचा जागर:
प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरवरून हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरेशी निगडीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका तरुण कीर्तनकार मुलीची कथा आणि तिच्याभोवती रिंगण घालून कीर्तनात रंगलेले वारकरी असे या पोस्टरचे स्वरूप असून, या टीझरने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

तगडी स्टारकास्ट आणि अनुभवी तंत्रज्ञ:
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले आहे, तर राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

छायांकन: अभिषेक शेटे

संकलन: सौरभ प्रभुदेसाई

ध्वनी आरेखन: शांतनु-दिनेश

संगीत: निरंजनेडगावकर

गीतलेखन: प्रदीप आवटे

तथापि, चित्रपटातील मुख्य भूमिका ‘पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार, हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/07/27/a-truck-crashed-into-the-divider-and-overturned-on-the-ghoti-sinnar-phata-flyover-causing-a-massive-traffic-jam-on-the-highway/

नाटकापासून ते चित्रपटाच्या प्रवासापर्यंत:
दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘पांच फुटाचा बच्चन’ या एकपात्री नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. पहिल्याच प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर मुंबई-पुण्यासह गावोगावी या नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले. अनेक पुरस्कार आणि महोत्सवांमध्ये गौरव झाल्यानंतर या नाटकावर चित्रपट बनवण्याची कल्पना पुढे आली.
गेल्या वर्षभरात सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here