Home देश RAW : ‘रॉ’ अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

RAW : ‘रॉ’ अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

0
RAW : ‘रॉ’ अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद
Fraud

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला ‘रॉ'(RAW)अधिकारी असल्याचे भासवत खाते सुरू करून देण्यासाठी सव्वा चार लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या परेश प्रवीण कोठारी(वय ४२,रा.सातारा रस्ता,पुणे)याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/07/27/examination-reform-bill-examination-reform-bill-introduced-in-parliament-proceedings-of-both-lok-sabha-and-rajya-sabha-adjourned-amidst-uproar-by-the-opposition/

तक्रारदाराच्या खात्यात वेगवेगळ्या खात्यांतून चार हजार रुपये जमा झाल्यानंतर बँक खाते गोठविण्यात आले.चौकशीत हे व्यवहार पुण्यातील खात्यांतून झाल्याचे समोर आले.त्यानंतर संशयिताने व्हॉट्सॲप कॉलद्वारे(WHATSAPPCALL) संपर्क साधत स्वतःला ‘रॉ’अधिकारी असल्याचे सांगितले आणि खाते सुरू करण्यासाठी सुरुवातीला पाच लाख,नंतर तडजोडीनंतर सव्वा चार लाख रुपयांची मागणी केली.पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,अशी धमकीही दिली.

तक्रारदाराने वकिलांच्या सल्ल्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.सातारा रस्त्यावरील पंचमी चौक परिसरात खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या परेश कोठारीला रंगेहात अटक करण्यात आली असून पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here