मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची लोकसभेत माहिती
मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनासाठी आणि पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने २२ हजार ४२५ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सोमवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत या आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आल्याचे राज्य सरकारने केंद्र सरकारला कळवले आहे.(Devendra Fadnavis)
https://prahaar.in/2026/07/27/shivnath-ayurvedas-license-permanently-cancelled/
सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, विविध विभागांमधील समन्वय आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य शासनाने विशेष त्रिस्तरीय समिती रचना अमलात आणली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ४० सदस्यांची उच्चस्तरीय शिखर समिती गठीत करण्यात आली असून, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नाशिकच्या खासदारांचाही यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आयोजनाच्या रोजच्या समन्वयासाठी एक कार्यकारी समिती आणि धोरणात्मक निर्णयांना गती देण्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती कार्यरत करण्यात आली आहे.(Kumbhamela)
https://prahaar.in/2026/07/27/countrys-first-travelator-skywalk-in-mumbai-metro-monorail-and-railways-to-converge-at-mahalaxmi-commuters-to-save-time/
विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, निधीचे सुटसुटीत व्यवस्थापन आणि विविध प्रशासकीय यंत्रणांमध्ये सुसूत्रता राखण्यासाठी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण’ स्थापन करण्यात आल्याची माहितीही संसदेत देण्यात आली. दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्रालय विविध प्रादेशिक उत्सव आणि जत्रांसाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य (CAF) मंजूर करत असले, तरी नाशिक कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे अद्याप कोणताही निधी मागणीचा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, असेही केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले.