Home ब्रेकिंग न्यूज Mulund Dumping Ground : धारावी विकास प्रकल्प कामासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा देणार ५ वर्षांसाठी

Mulund Dumping Ground : धारावी विकास प्रकल्प कामासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा देणार ५ वर्षांसाठी

0
Mulund Dumping Ground : धारावी विकास प्रकल्प कामासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा देणार ५ वर्षांसाठी
Mulund Dumping Ground

 

सचिन धानजी

तब्बल १५ एकरची जागा वापर कास्टींग यार्ड, प्रीकास्टच्या निर्मितीसाठी

महापालिकेला १०३ कोटी रुपयांचा महसूल मिळणार

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरिता मुलुंड डंपिंग ग्राऊंड (Mulund Dumping Ground) येथील १५ एकर जमीन ५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार असून या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये धारावी विकास प्रकल्पातंर्गत महापालिकेला सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. धारावी विकास प्रकल्पासाठी मुलुंडमधील (Mulund) जागा ही कास्टींग यार्डकरता (Casting Yard) पाच वर्षांकरता दिला जाणार आहे.

https://prahaar.in/2026/07/26/france-wildfire-rampant-wildfires-in-spain-and-france-over-265000-people-evacuated-one-death-reported/

राज्य शासनाच्यावतीने धारावीचा विकास करण्यासाठी विशेष पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा धारावी पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कास्टिंग यार्ड, प्रीकास्ट घटक निर्मिती व रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट उभारणीसाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे. या अनुषंगाने, राज्य शासनाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी मुलुंड डंपिंग ग्राऊंड येथील सुमारे १५ एकर जमीन तात्पुरत्या स्वरूपात ५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याची विनंती केलेली आहे. मुलुंड डंपिंग ग्राऊंड येथे सध्या बायोमायनिंग प्रकल्प सुरू असून, काही क्षेत्र जमीन पातळीपर्यंत पुनर्प्राप्त करण्यात आलेले आहे. परंतु भाडेतत्वावर दिल्या जाणाऱ्या १५ एकर क्षेत्रामध्ये अजूनही अंदाजे २.५ ते ३ लाख मेट्रिक टन लिगसी कचरा अस्तित्त्वात आहे. त्यामुळे जमीन वापरण्यायोग्य करण्यासाठी साइट रेमेडिएशन, कचरा हटविणे, माती स्थिरीकरण व समपातळीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार अजुनही कचरा अस्तित्वात असलेली १५ एकर जागा धारावी विकास प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी ६ टक्के वाढ गृहीत धरुन ५ वर्षांच्या कालावधीसाठी एकूण भाडे रक्कम १०३.४७ कोटी रुपये आकारले जाणार आहे. मात्र, या १५ टक्के क्षेत्रफळावर अद्यापही कचरा असल्याने त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावली जाणार असल्याने त्यासाठी २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा २० कोटी रुपयांचा खर्च वगळता धारावी विकास प्रकल्प कामासाठी पाच वर्षांचे भाडे हे ८३ कोटी रुपये एवढेच आकारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी हा भूभाग वापरण्यायोग्य करण्यासाठी त्यांना सुमारे २०.०४ कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च जसा की लिगसी कचरा हटविणे, माती स्थिरीकरण, साइट क्लिअरिंग इत्यादी करावा लागणार असल्याचे म्हटले आहे.

धारावी विकास प्रकल्पासाठी भाडेतत्वावर दिल्या जाणाऱ्या जागेचे वैशिष्ट्ये

  • या जागेचा काय केला जाणार वापर : कास्टिंग यार्ड, प्रीकास्ट घटक निर्मिती व रेडी मिक्स कॉक्रीट प्लांट
  • भाडेपट्टा कालावधी किती असेल : ५ वर्षे
  • रेडीरेकनरचा आजचा दर: ४७,८०० रुपये प्रति चौ.मी
  • जागेचे क्षेत्रफळ: ६०,७०३ चौ.मी. (म्हणजेच १५ एकर)

कास्टिंग यार्डसाठी २५२ रुपये प्रति चौ. मी. प्रति महिनादर लागू करण्यात आला आहे त्यानुसारः

  • मासिक भाडेः रु.१,५२,९७,१५६ रुपये
  • वार्षिक भाडेः रु.१८,३५,६५,८७२ रुपये
  • एकूण भाडे (५ वर्षे): १०३.४७ कोटी रुपये
  • कचरा हटवण्यासाठी होणारा खर्च : २०.०४ कोटी रुपये
  • कचरा हटवण्याचा खर्च वळता करता महापालिकेला मिळणारा महसूल : ८३.४४ कोटी रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here