Home ब्रेकिंग न्यूज “तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप महिला…”; पतीच्या या बोलण्यावर दिग्गज अभिनेत्रीचा मोठा खुलासा, दोन दशकांपासून राहत आहेत वेगळे

“तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप महिला…”; पतीच्या या बोलण्यावर दिग्गज अभिनेत्रीचा मोठा खुलासा, दोन दशकांपासून राहत आहेत वेगळे

0
“तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप महिला…”; पतीच्या या बोलण्यावर दिग्गज अभिनेत्रीचा मोठा खुलासा, दोन दशकांपासून राहत आहेत वेगळे
Actress Apara Mehta and Darshan Jariwala

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांमध्ये पोहोचलेल्या दिग्गज आणि लाडक्या अभिनेत्री अपरा मेहता (Aapara Mehta) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आणि खासगी आयुष्याविषयी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. पती दर्शन जरीवाला यांनी लग्नाच्या वाढदिवशीच त्यांना अत्यंत अपमानास्पद शब्द वापरत घर सोडल्याचे त्यांनी सांगितले. अपरा आणि त्यांचे पती, अभिनेते दर्शन जरीवाला हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून (सुमारे २००३-२००४ पासून) एकमेकांपासून विभक्त राहत आहेत, मात्र त्यांचा अद्याप अधिकृत घटस्फोट झालेला नाही.

https://prahaar.in/2026/07/25/3-men-physical-abuse-neet-student-who-went-for-picnic-with-boyfriend-near-devangana-airport-forest-area-in-chitrakoot-uttar-pradesh/

लग्नाच्या वाढदिवशीच बसला होता धक्का

‘हॉटरफ्लाय’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अपरा मेहता जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, “मी माझा शो संपवून अमेरिकेतून थेट भारतात परतले होते. मी मध्यरात्री ३ वाजता विमानतळावर पोहोचले आणि तिथून पहाटे ५ वाजता घरी पोहचले. मात्र, माझ्या या प्रवासाच्या थकव्याचा विचार न करता, अवघ्या दोन तासांतच म्हणजेच सकाळी ७ वाजता माझी शूटिंगची शिफ्ट होती. याच दिवशी आमचा लग्नाचा वाढदिवस होता. अगदी सकाळीच त्यांनी चहाचा कप हातात घेऊन मला अत्यंत धक्कादायक गोष्ट सांगितली.” पुढे भावनिक होत त्या म्हणाल्या, “त्यांनी मला म्हटलं होतं की, ‘हे पहा अपरा.. आपण आता विभक्त होऊयात. कारण मी आता तुझ्यावर प्रेम करत नाही. मला आता तू अजिबात आवडत नाहीस. इतकंच नव्हे तर, तू माझ्या आयुष्यातील सर्वांत कुरूप महिला आहेस.’ हे ऐकून मला मोठा मानसिक धक्का बसला होता.”

https://prahaar.in/2026/07/25/ind-vs-zim-2nd-t20-team-india-ready-to-assert-dominance-in-the-series-all-eyes-on-vaibhav-suryavanshi-shreyas-iyer-has-a-chance-to-set-a-world-record/

शूटिंगच्या वेळी लागत होती झोप, पण पतीचे शब्द मनात घर करून होते

त्या दिवशीच्या आठवणी सांगताना अपरा म्हणाल्या की, त्या दिवशी त्यांना तीन मोठे सीन्स शूट करायचे होते. अमेरिकेतून विनाथांती परतल्यामुळे त्यांना प्रचंड झोप येत होती आणि प्रत्येक टेकच्या मधे त्यांना डुलक्या लागत होत्या. शूटिंग संपवून जेव्हा त्या शुद्धीवर आल्या, तेव्हा त्यांना वाटले की दर्शन यांनी कदाचित रागाच्या भरात किंवा चुकीचे शब्द वापरले असतील, त्यांचा तसा अर्थ नसावा. परंतु, काही दिवसांतच ते घर सोडून निघून गेले.

https://prahaar.in/2026/07/25/nta-announces-senior-professional-posts-invites-young-professionals-through-upsc-pratibha-setu/

घटस्फोट नाही, आजही घराचे दरवाजे खुले

अपरा आणि दर्शन जरीवाला यांनी १९८० मध्ये लग्न केले होते आणि १९८१ मध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली होती. या दोघांना ‘खुशाली’ नावाची एक मुलगी देखील आहे. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते वेगळे राहत असले तरी त्यांच्यात आजही सौहार्दपूर्ण संबंध आहेत. आपल्या नात्याबद्दल बोलताना अपरा म्हणाल्या, “आमचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. माझ्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले आहेत. हे अजूनही आमचंच घर आहे आणि ते हवे तेव्हा परत येऊ शकतात. पण मला हेसुद्धा उत्तम प्रकारे माहीत आहे की ते कदाचित कधीच परत येणार नाहीत. आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात खूप स्पष्ट आणि समाधानी आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here