Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार – मंत्री छगन भुजबळ

Nashik : नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार – मंत्री छगन भुजबळ

0
Nashik : नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार – मंत्री छगन भुजबळ

Nashik : अंदरसुल येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होवून ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले अंदरसूल, ता. येवला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसूल मुख्य इमारतीचे उद्घाटन मंत्री श्री.भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

https://prahaar.in/2026/07/25/major-development-amidst-the-paper-leak-uproar-union-education-minister-dharmendra-pradhan-submits-resignation-to-prime-minister-modi/

या केंद्राला तीन वेळा ‘कायाकल्प’ पुरस्कार

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सुमारे 46 हजार लोकसंख्या असून केंद्रामार्फत उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जात आहे. स्वच्छता, सुयोग्य व्यवस्थापन व दर्जेदार सेवेमुळे या केंद्राला तीन वेळा ‘कायाकल्प’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. येथे दररोज ८० हून अधिक बाह्यरुग्णांवर उपचार केले जातात, तर दरमहा सुमारे दीड हजारांहून अधिक रुग्ण ओपीडीचा लाभ घेतात. याशिवाय सुरक्षित प्रसूती सेवा, माता-बाल आरोग्य, लसीकरण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आपत्कालीन सेवा आदी विविध सुविधा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.

केंद्राला मिळालेला सन्मान हा केवळ इमारतीचा नसून येथे कार्यरत डॉक्टर, परिचारिका व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेमुळे मिळाल्याचे सांगत मंत्री श्री.भुजबळ यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून आरोग्य कर्मचारी नागरिकांची सेवा करत असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आवश्यकतेच्या वेळी दर्जेदार उपचार तत्काळ उपलब्ध व्हावेत, यासाठी शासन आरोग्य सुविधांचे बळकटीकरण सातत्याने करत असल्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/07/25/more-than-half-of-the-states-dams-are-full/

यानंतर येवला रेल्‍वे स्‍टेशन जवळ, पंचायत समिती निवासस्थानाजवळ तालुका सार्वजनिक आरोग्य केंद्र प्रयोगशाळा भुमीपूजन मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, डॉ जयश्री पवार उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, वैद्यकीय अधिकारी, डॉ.जयश्री पवार, डॉ सचिन वैद्य, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद तारू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, आशा सेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here