Nashik : नाशिक जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावांना दुसऱ्या दिवशीही शनिवारी ( दि.२५) पुराच्या पाण्याचा वेढा कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र शनिवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली असून, नदीपात्रातील पाण्याची पातळी घटू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. दरम्यान, चांदोरी , सायखेड्याची वाहतूक काहीसी सुरळीत झाली असली तरी नांदूरमधमेश्वरची वाहतूक अद्यापही बंदच आहे.
https://prahaar.in/2026/07/25/ind-vs-zim-ishan-kishans-storm-in-harare-target-of-220-runs-set-for-zimbabwe/
चांदोरी-सायखेड्याला दुसऱ्या दिवशीही पुराचा वेढा कायम
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावांना दुसऱ्या दिवशीही पुराच्या पाण्याचा वेढा कायम होता. विविध धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शुक्रवारी या दोन्ही गावांमध्ये पाणी शिरले होते.
https://prahaar.in/2026/07/25/water-discharge-from-gangapur-dam-continues/
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
शनिवारीही गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अन्य शासकीय कार्यालये पाण्याखालीच असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत राहिले. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच खासदार राजाभाऊ वाजे भगरे यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
६ वाजता धरण विसर्ग (क्युसेकमध्ये)
गंगापूर – 8370
कादवा – 5932
भावली – 1821
पालखेड – 3540
पुणेगाव – 1568
जोझरखेड – 1750
होळकर ब्रिज – 12300
दारणा – 13100
गौतमी गोदावरी – 1500
कश्यपी – 500
नांदूर मध्यमेश्वर धरण – 64726
वालदेवी – 2175
भाम – 3892
चणकापूर धरण – 5425