Home ब्रेकिंग न्यूज Parth Pawar : पार्थ पवार लवकरच अडकणार विवाहबंधनात; कोण आहेत कायनात दारा? जाणून घ्या

Parth Pawar : पार्थ पवार लवकरच अडकणार विवाहबंधनात; कोण आहेत कायनात दारा? जाणून घ्या

0
Parth Pawar : पार्थ पवार लवकरच अडकणार विवाहबंधनात; कोण आहेत कायनात दारा? जाणून घ्या
Parth Pawar Marriage

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्यसभेचे खासदार (Rajya Sabha MP) पार्थ पवार (Parth Pawar) यांनी कायनात दारा (Kainat Dara) यांच्याशी विवाह (Marriage) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार आहे. त्याआधी २९ जुलै २०२६ रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईक व निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा (Engagement) समारंभ होणार आहे.

मागील काही दिवसांपासून कायनात दारा यांच्या नावाबाबत आणि मूळ गावाबाबत विविध माध्यमांमध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत होती. यानंतर पार्थ पवार यांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती (Official Information) देत या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. अधिकृत माहितीनुसार, कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. अनेक माध्यमांनी त्यांचा उल्लेख काश्मिरी म्हणून केला होता. मात्र त्या काश्मिरी नसून पंजाबी (Punjabi) आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/07/24/central-government-in-action-mode-against-paper-leaks-major-decision-expected-on-friday-pm-modi-shares-a-video/

कायनात दारा यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘द ब्रिटिश स्कूल’ (The British School) चाणक्यपुरी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जगातील नामांकित शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ (London School of Economics – LSE) मधून उच्च शिक्षण (Higher Education) घेतले. सामाजिक शास्त्रे (Social Sciences), अर्थशास्त्र (Economics), आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) आणि सार्वजनिक धोरण (Public Policy) या क्षेत्रांमध्ये एलएसईला (LSE) जागतिक स्तरावर विशेष मान्यता आहे.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायनात दारा यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिनी (English News Channel) एनडीटीव्ही (NDTV) मध्ये आऊटपुट एडिटर (Output Editor) आणि रिपोर्टर (Reporter) म्हणून काम केले आहे. पत्रकारिता (Journalism) क्षेत्रातील अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची धुरा स्वीकारली.

सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी (Hospitality) आणि रिअल इस्टेट (Real Estate) व्यवसायात कार्यरत आहेत. पार्थ पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार असून, या विवाहानंतर कायनात दारा या उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाचा भाग होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here