Nashik : नाशिक शहर आणि परिसरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र तीन दिवस सुरु असलेल्या संततधार मुसळधार पावसाने नाशिक शहराला अक्षरश झोडपून काढले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhyameshwar Dam) गोदावरी नदीपात्रात करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी ११ वाजता विसर्ग ८८,९३५ क्युसेक्सवरून ५,५६२ क्युसेक्सने वाढवून एकूण ९४,४९७ क्युसेक्स करण्यात आला असल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाच्या (Nashik Irrigation Division) पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
https://prahaar.in/2026/07/24/security-stepped-up-at-sensitive-locations-and-outside-the-residences-of-senior-leaders-in-the-state/
पाटबंधारे विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात असलेले साहित्य तसेच जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित प्रशासकीय विभागांनीही पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल ए. शहाणे यांनी केले आहे.
https://prahaar.in/2026/07/24/bharat-gogavale-took-darshan-of-vitthal-while-standing-in-the-queue-with-the-varakyans-anandwari-uthamalahi-heartfelt-gift/
गंगापूर धरणातील पाणी विसर्गात वाढ
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता होत असेलल्या विसर्गात ४७५ क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणातून (Gangapur Dam) एकूण १४४०७ क्युसेक वेगाने पाणी गोदापात्रात सोडले जात आहे. त्यामुळे आता दुतोंड्या मारुती बुडाला आहे. नदीकाठच्या भांडी बाजारात पाणीस शिरले असून सराफ बाजारात देखील पाणी शिरले आहे.
https://prahaar.in/2026/07/24/bhumipujan-for-the-simhastha-mahakumbh-and-worship-of-the-ganga-godavari-rivers-to-be-held-at-kavanai-on-sunday/
गुरुवारी गंगापूर धरणातून करण्यात येणारा विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सकाळी रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत असलेले पाणी सायंकाळी मानेपर्यंत पोहचले. तर आज मारुती बुडाला आहे. नदीपात्रातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली. रामसेतू पुलावरुन पाणी जात आहे. तर इकडे ग्रामीण भागात गोदावरीचे पाणी निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये शिरले आहे.