Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon Crime News : सोलर सिस्टीम मंजुरीसाठी मागितली लाच, महावितरणचा अभियंता रंगेहाथ ताब्यात

Jalgaon Crime News : सोलर सिस्टीम मंजुरीसाठी मागितली लाच, महावितरणचा अभियंता रंगेहाथ ताब्यात

0
Jalgaon Crime News : सोलर सिस्टीम मंजुरीसाठी मागितली लाच, महावितरणचा अभियंता रंगेहाथ ताब्यात

Jalgaon Crime News : जळगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. सोलर प्रकल्पाच्या रिलीज ऑर्डरसाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या भुसावळ विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. नितीन अभिमन्यू पाटील (वय 42) असं लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी तापी नगरातील चोपडा बिल्डींगजवळ ही कारवाई करण्यात आली.

https://prahaar.in/2026/07/23/whatsapp-hack-of-this-bjp-mla-from-nashik/

नेमकं प्रकरण काय ?

तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी असून, त्या एजन्सीमार्फत दोन ग्राहकांकडे सोलर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. आणि या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली रिलीज ऑर्डर मंजूर करण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती. नितीन पाटील यांनी संधी हेरली आणि ही प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रकरणामागे एक हजार रुपये, अशा एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. (Jalgaon Crime News )

https://prahaar.in/2026/07/23/increase-in-discharge-from-gangapur-dam-water-discharge-now-at-12600-cusecs/

नितीन पाटील रंगेहात ताब्यात

मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचेची मागणी होताच तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पडताळणीत तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. नियोजनानुसार तक्रारदाराने आरोपीला ठरलेली रक्कम दिल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई करत नितीन पाटील यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here