Home महाराष्ट्र नाशिक Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; आता 12,600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; आता 12,600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

0
Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; आता 12,600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गुरुवार (23 जुलै) सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला होता. दरम्यान हा विसर्ग आता 1 वाजता 12,600 करण्यात आला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

https://prahaar.in/2026/07/23/shocking-married-woman-tortured-by-having-lemon-juice-squeezed-into-her-eyes-subjected-to-brutal-abuse-to-force-her-to-bring-money-from-her-maternal-home/

गंगापूर धरणातून विसर्गात वाढ

पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 1 वाजता 12,600 क्यूसेक्सने विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच, परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/07/23/nashik-trimbakeshwar-hit-by-gusty-winds/

महानगरपालिका, जिल्हा प्रशासन (District Administration) तसेच संबंधित विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here