Home क्रीडा PV Sindhu : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूंचे आव्हान संपुष्टात

PV Sindhu : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूंचे आव्हान संपुष्टात

0
PV Sindhu : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूंचे आव्हान संपुष्टात

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) चायना ओपन २०२६ (China Open 2026) मधील प्रवास अंतिम १६ च्या फेरीतच संपुष्टात आला आहे. चीनच्या चौथ्या मानांकित चेन यू फेईने (Chen Yufei) जोरदार पुनरागमन करत सिंधूला १६-२१, २२-२०, २१-१८ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

https://prahaar.in/2026/07/23/zim-vs-ind-abhishek-sharma-set-to-become-indias-fourth-fastest-batter-to-reach-the-16-run-mark-could-script-a-special-record/

सिंधूने (PV Sindhu) सामन्याची जोरदार सुरुवात करत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सामना संपवण्याच्या तिला चार संधी मिळाल्या असल्या तरी, ती त्या संधीचे सोने करू शकली नाही आणि चेनने सलग पाच गुण जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला. पहिल्या गेममध्ये चेनने (Chen Yufei) १२-६ अशी आघाडी घेतली होती, परंतु सिंधूने शानदार पुनरागमन करत १६-१६ अशी बरोबरी साधली आणि नंतर तो गेम २१-१६ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूचे पूर्ण नियंत्रण दिसत होते, तिने २०-१७ अशी आघाडी घेतली होती आणि तिच्याकडे चार मॅच पॉईंट्स होते. पण चेनने (Chen Yufei) जोरदार पुनरागमन करत सलग पाच गुण मिळवले आणि २२-२० ने गेम जिंकून सामना तिसऱ्या गेममध्ये नेला. निर्णायक गेममध्येही सिंधूने सुरुवातीला आघाडी घेतली होती. पण चेन यु फेईने अंतिम टप्प्यात सातत्याने प्रभावी गुण मिळवत २१-१८ ने गेम जिंकून सामना आपल्या नावावर केला. (China Open 2026)

https://prahaar.in/2026/07/22/virat-kohli-at-the-feet-of-premanand-maharaj-after-the-england-tour/

टोकियो ऑलिम्पिक २०२० सुवर्णपदक विजेती चेन यु फेई आता उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रॅचनोक इंटानॉन आणि व्हिएतनामच्या गुयेन थुई लिन्ह यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी सामना करेल. दरम्यान, या पराभवामुळे अनुभवी भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची (PV Sindhu) चायना ओपन २०२६ मधील मोहीम संपुष्टात आली आहे. (China Open 2026)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here