Home देश Ayodhya : धार्मिक व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन

Ayodhya : धार्मिक व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन

0
Ayodhya : धार्मिक व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन
Ayodhya

नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिराच्या व्यवस्थापन आणि धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंदिरातील सर्व धार्मिक विधी, दैनंदिन पूजा-अर्चना आणि वार्षिक उत्सवांच्या संचालनासाठी विशेष नऊ सदस्यीय धार्मिक समितीची स्थापना करण्यात आली आहे.(Ayodhya)

https://prahaar.in/2026/07/22/terrorist-attack-on-police-team-in-anantnag-injured-head-constable-martyred/

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये एकूण नऊ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यापैकी अयोध्येतील पाच प्रमुख संत आणि बाहेरील चार धार्मिक सदस्यांचा समावेश आहे. अयोध्येतील संतांमध्ये मणिराम छावणीचे महंत कमलनयन, रामकथा कुंजचे रामानंद दास, रमावल्लभा कुंजचे राजकुमार, मिथिलेश नंदिनी शरण आणि निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास यांचा समावेश आहे.तर ट्रस्टच्या वतीने धार्मिक सदस्य म्हणून जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद, स्वामी परमानंद, उडुपी येथील पेजावर पीठाचे विश्वप्रसन्न तीर्थ आणि स्वामी गोविंद देव गिरी यांची निवड करण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/07/22/trinamool-congress-mp-kalyan-banerjee-suspended-from-the-lok-sabha/

दरम्यान, ट्रस्टच्या कामकाजातील माहितीचा सुरळीत प्रसार करण्यासाठी लवकरच अधिकृत प्रवक्त्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाच्या निवडीवरही चर्चा झाली. या पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ट्रस्टने आणखी एक महिन्याचा कालावधी घेतला आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयांनंतर ट्रस्टची पुढील बैठक दोन सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here