Home ब्रेकिंग न्यूज BMC News : महापालिका कार्यालयांसह रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आता पचापच बंद

BMC News : महापालिका कार्यालयांसह रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आता पचापच बंद

0
BMC News : महापालिका कार्यालयांसह रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आता पचापच बंद
Tobacco Spitting

मुंबई : मुंबईत (Mumbai) मोठ्याप्रमाणात तंबाखू (Tobacco), पान तसेच, मावा यांचे सेवन केले जात असून यामुळे बऱ्याचदा महापालिका कार्यालयांसह दवाखाने तसेच रुग्णालयांमधील कोपरा किंवा जिन्यावरील भागांमध्ये पचापच थुंकून त्या भिंती लाल रंगाने रंगवल्या जात असतात. परंतु आता यासर्व ठिकाणी अशाप्रकारे सेवन करून जाण्यास बंदी केली जाणार असून त्यामुळे अशाप्रकारच्या सर्व ठिकाणी नागरिकांना पचपच थुंकणे बंद होणार असून अशाठिकाणी प्रवेश देतानाच अशाप्रकारचे सेवन करणाऱ्यांना अडवले जाणार आहे.

मुंबई महापालिका (BMC) सभागृहनेते गणेश खणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली असून याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सर्व विभागीय व प्रशासकीय कार्यालये, महापालिका रुग्णालये, दवाखाने तसेच इतर सर्व महापालिका आस्थापनांमध्ये गुटखा अथवा तंबाखूचे सेवन करून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करण्यात यावा. तसेच या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रवेशद्वारांवर सूचना फलक लावण्यात यावेत व सुरक्षा यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात अशाप्रकारच्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी देण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/07/22/bmc-news-mayors-medical-assistance-fund-cell-modeled-on-the-chief-ministers-medical-assistance-fund/

या ठरावामध्ये खणकर यांनी असे म्हटले आहे की, सर्व महापालिका आस्थापनांमध्ये अनेक व्यक्ती गुटखा अथवा तंबाखूचे सेवन करून येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा व्यक्तींकडून कार्यालयीन परिसरात व सार्वजनिक ठिकाणी धुंकण्याचे प्रकार घडत असल्यामुळे परिसराची स्वच्छता बिघडते, अस्वच्छ वातावरण निर्माण होते तसेच महापालिकेच्या स्वच्छ, शिस्तबद्ध व नागरिकाभिमुख प्रतिमेलाही बाधा पोहोचते. यामुळे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि शिस्तीच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण होत आहेत. महानगरपालिका स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वतःच्या कार्यालयीन परिसरात गुटखा अथवा तंबाखूचे सेवन करून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशास प्रतिबंध करणे ही काळाची गरज आहे. यामुळे कार्यालयीन परिसर स्वच्छ राहण्यास, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होण्यास तसेच नागरिकांमध्ये तंबाखूमुक्त वातावरणाबाबत सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल,असे नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here