Home ब्रेकिंग न्यूज Ajit Pawar : अजितदादांची जागा घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला!

Ajit Pawar : अजितदादांची जागा घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला!

0
Ajit Pawar : अजितदादांची जागा घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला!

– मंत्री छगन भुजबळ यांचा अंतर्गत विरोधकांना टोला; आता सुनेत्रा पवार यांच्या रुपात दादांना पाहूयात

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर रिकामी झालेली जागा घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र पक्षाने तसे होऊ दिले नाही, अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अंतर्गत विरोधकांना टोला लगावला. तसेच, यापुढील काळात सुनेत्रा पवार यांच्या रुपात अजितदादांना पाहून सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

https://prahaar.in/2026/07/22/he-took-her-to-a-lodge-and-something-horrific-happened-a-four-year-long-romance-was-ended-in-a-single-moment/

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अजितदादांच्या कामाच्या पद्धतीचे आणि निर्णयांचे स्मरण करताना भुजबळ भावुक झाले. सहकार, शिक्षण, महिला कल्याण यांसारख्या विविध क्षेत्रांत दादांचे मोठे योगदान राहिले असून, सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करणारा आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती, असे ते म्हणाले. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत दादांचे योगदान मोठे होते. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुढे नेण्याची गरज असून, महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्वांनी ताकद दिली पाहिजे, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नमूद केले.

https://prahaar.in/2026/07/22/a-grand-memorial-of-the-late-ajitdada-pawar-will-be-erected-at-nashiks-pelican-park/

दरम्यान, याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी सुनेत्रा पवार (sunetra Pawar) यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले. २००४ मध्ये अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली. मात्र, भविष्यात बहुमताचा आकडा गाठून सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. याशिवाय दिल्लीतील आंदोलनावर भाष्य करताना, घडलेल्या घटना दुर्दैवी असून त्या टाळता आल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते, असे मत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here