मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मिरज दरम्यान आणखी दोन ‘वन-वे’ आषाढी विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. (Ashadhi Wari Special Train)
‘या’ दिवशी धावणार विशेष गाड्या :
गाडी क्रमांक 01183 ही ‘वन-वे’ विशेष गाडी २५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि २६ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता मिरज येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01181 ही विशेष गाडी २६ जुलै २०२६ रोजी रात्री १२.२५ वाजता CSMT येथून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.२५ वाजता मिरजला पोहोचेल. (Ashadhi Wari Special Train)
https://prahaar.in/2026/07/22/proposed-midc-at-nadhavde-vaibhavwadi-now-to-be-located-at-an-alternative-site-guardian-minister-nitesh-rane/
‘या’ स्थानकांवर थांबा :
दोन्ही विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि सोलापूर मार्गावरील भाविकांनाही या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे. (Ashadhi Wari Special Train)
गाड्यांची संरचना :
या विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणीतील डबे उपलब्ध असतील.
१ वातानुकूलित द्वितीय श्रेणी
३ वातानुकूलित तृतीय श्रेणी
८ शयनयान (स्लीपर)
४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
२ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन
२३ जुलैपासून आरक्षण सुरू
https://prahaar.in/2026/07/22/western-railway-railone-app-western-railway-urges-passengers-to-use-the-railone-app/
गाडी क्रमांक 01183 आणि 01181 या दोन्ही विशेष गाड्यांचे आरक्षण २३ जुलै २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. प्रवासी ‘रेलवन’ (RailOne) अॅपद्वारेही तिकीट आरक्षित करू शकतात. मध्य रेल्वेने प्रवाशांना गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी NTES अॅप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. (Ashadhi Wari Special Train)
आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. ही अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू केल्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होणार आहे. (Ashadhi Wari Special Train)