मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी सकाळी महाराष्ट्रातील काही भागांसाठी इशारा जारी केला आहे. सकाळी १० वाजता जारी करण्यात आलेल्या या इशाऱ्यानुसार, पुढील ३ तासांत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Rain) सरी पडण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain)
https://prahaar.in/2026/07/21/horrific-tunnel-accident-in-sikkim-8-workers-dead-19-feared-trapped/
पुढील जिल्ह्यांसाठी यलो अर्लट
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (IMD Alert)
https://prahaar.in/2026/07/20/president-murmu-arrives-in-moldova-welcomed-by-deputy-prime-minister/
विशेष खबरदारी घ्यावी
पावसामुळे काही भागांमध्ये रस्ते ओले होणे, वाहतूक मंदावणे आणि दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (Maharashtra Weather)
विशेषतः वाहनचालकांनी सावधगिरीने वाहन चालवावे, पावसादरम्यान अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी अधिकृत हवामान अपडेटवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.