Home संपादकीय अग्रलेख आंदोलनजीवी…

आंदोलनजीवी…

0
आंदोलनजीवी…
dehli parlament

संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आणि संसदेला वादळी सुरुवात झाली. अर्थात या वेळी विरोधकांकडे भरपूर दारूगोळा होता आणि त्यात नीट परीक्षेच्या गैरप्रकारांच्या अानुषंगाने मोदी सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आणि कॉकरोच जनता पार्टीचे तथाकथित आंदोलनाला मिळणारा उदंड प्रतिसाद यामुळे अधिवेशन चांगलेच चर्चेत राहिले. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवले. वांगचुक यांच्या पत्नीची याचिका न्यायालयाने अमान्य केली आणि त्यांना दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. आता कॉकरॉच जनता पार्टीने उपस्थित केलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांचे आहे. त्याचा विरोधी पक्षांच्या नेत्यांशी तसा काही संबंध नाही. पण केवळ मोदी सरकारला घेरण्यासाठी एक मुद्दा मिळतो आहे, म्हणून हे सारे विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले आहेत.

https://prahaar.in/2026/07/21/cabinet-decision-these-5-important-decisions-were-taken-at-the-state-cabinet-meeting/

कोणालाही अभिजीत दीपके यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये रस नाही. केवळ भाजपच्या विरोधात आंदोलन करून मिळाले तर त्या आंदोलनाचा उपयोग करून घ्यायचा आहे, हे त्यांचे षडयंत्र स्पष्ट दिसते. अन्यथा उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला नसता. विरोधी पक्ष, मग ती शिवसेना उबाठा असो किंवा तृणमूल काँग्रेस असो. या अधिवेशनाच्या अगोदर फुटीमुळे खिळखिळे झाले आहेत. स्वतःच्या चुकीमुळे पक्षाचे पानिपत झाले, पण आता सीजेपीच्या तुटक्या आधाराने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलनात आता योगेंद्र यादव हेही सामील झाले आहेत. ते तर जिथे जातील तेथे वाटोळेच करतात. तेच या आंदोलनाचे होणार आहे. सोनम वांगचुक यांच्याविषयी बोलायचे तर अशी चर्चा आहे की, त्यांच्याबद्दल पसरलेली माहिती ही तद्दन बनावट आहे. २००९ पासून आमिर खान याचा थ्री इडियट्स हा चित्रपट आला आणि तेव्हापासून देशात असे भासवण्यात आले की त्यातील आमिर खानची वांगडूची भूमिका ही सोनम वांगचुक यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. पण दोन दिवसांपूर्वी आमिर खानने हे स्पष्ट केले आहे की, चित्रपट जेव्हा रिलीज झाला, तेव्हा आपण वांगचुक यांना ओळखतही नव्हतो. वांगचुक यांचा खोटेपणा उघड झाला आहे. अर्थात वांगचुक यांनी प्रशंसनीय काम केले आहे आणि त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात जे काही कार्य केले आहे, ते चांगलेच आहे. त्याबद्दल कुणीही त्यांची प्रशंसाच करतील. पण वांगचुक यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन विरोधक भाजपला घेरण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो अश्लाघ्य आहे.

https://prahaar.in/2026/07/21/sikkim-landslide-pm-modi-prime-minister-speaks-with-sikkim-chief-minister-regarding-the-samardung-tunnel-accident/

यंदाचे संसदेचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. सरकार आठ विधेयके मांडणार आहेत व एनडीए लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताच्या जवळपास पोहोचले आहे. ही बाब विरोधकांना सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांची आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला घेरण्याची रणनीती आहे. तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वतंत्र आसन व्यवस्था मंजूर केली आहे आणि येथेच विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. या सदस्यांच्या एनडीएतील प्रवेशामुळे त्यांची लोकसभेतील सदस्य संख्या आता ३६० झाली आहे. या आधी शाहीन बाग आणि आता जंतरमंतर हे स्थान अशा आंदोलनजीवींचे स्थान झाले आहे. वांगचुक यांनी सरकारपुढे तीन अटी ठेवल्या आहेत आणि त्या मान्य केल्या पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे. किसान आंदोलनाचे टिकैत हेही या आंदोलनात सहभागी होत आहेत, तर सपाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी आहेत. नेपाळमध्ये जेन झी आंदोलन झाले होते. त्याची पुनरावृत्ती विरोधी पक्षांना भारतात घडवायची आहे, हे स्पष्ट दिसते. हे खरे तर सरकारच्या विरोधात रचलेले षडयंत्र असल्याचे स्पष्ट दिसते. पण असे म्हणण्याला काही आधार नाही. पण जी वस्तुस्थिती दिसते, ती तर याकडे निर्दश करते की सारे काही आलबेल नाही. अर्थात कॉकरोच जनता पार्टी सरकारशी चर्चा करण्यास तयार आहे आणि तीन विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागेही घेतले आहे. पण विरोधी पक्षांना सामोपचाराने तयार झालेले वातावरण नको असावे, अशी शंका येते.

https://prahaar.in/2026/07/21/fifa-worldcup-2026-spains-world-cup-winning-team-returned-home-received-a-historic-and-grand-welcome-from-two-million-people-in-madrid/

दिल्लीत वातावरण सरकारविरोधी आहे, ही बाब सत्य आहे. पण सरकार आता बेरोजगारीच्या मुद्द्यावर वाटाघाटींना तयार झाले आहे. त्यामुळे तीन विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले. हे निश्चितच सकारात्मक संकेत आहेत. सोनम वांगचुक यांची प्रकृती उत्तम असल्याचे संकेत आहेत. ते उद्या मोर्चात सहभागी होणार आहेत. या देशात आंदोलनाला कुणीच मनाई केलेली नाही. लोकशाही मार्गाने जोपर्यंत आंदोलन चालू आहे, तोपर्यंत त्यांला परवानगीच आहे. जे. पी. नड्डा हे आंदोलकांशी वाटाघाटी करण्यास तयार झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीने सरकारशी वाटाघाटी कराव्यात. पण त्यांना हव्या त्या मागण्या पदरी पाडून घेण्यास ते स्वतंत्र नाहीत, हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. वांगचुक यांनी पूर्वी उपस्थित केलेल्या शिक्षणासंदर्भातील मुद्द्यावर जनतेची ही तशीच भूमिका आहे. अभिजीत दीपके यांची शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सरकार मान्य करणे अशक्य आहे. धर्मंेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची काही आवश्यकता नाही. कारण गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा तीच मागणी रेटून धरण्यात केवळ आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न आहे हे कळते. आता तर दीपके यांनी आपले आंदोलन मागे घेत नड्डा यांच्याशी वाटाघाटीची तयारी दाखविल्याने आंदोलनाची हवा निघून गेली आहे. अण्णा हजारे यांनी असेच आंदोलन केले होते आणि त्याच्या जोरावर अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांची सत्ता गेली, ही बाब निराळी. उपोषण सर्वात आधी महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. पण त्यांचे उपोषण हे कोणत्या वैयक्तिक लाभासाठी नव्हते. पण आताचे आंदोलनजीवी आहेत, त्यांना त्यांचा स्वार्थ अशी आंदोलने करण्यासाठी भाग पाडतो. दीपके कदाचित उद्या मोर्चात सहभागी होतील. पण अण्णांचे आंदोलन आणि आंदोलनजीवींचे आंदोलन यात काहीही गुणात्मक फरक नाही हे सिद्ध झाले. असे म्हणून त्यांच्या आंदोलनाच्या हेतूविषयी काहीही अधिक्षेप करण्याचा हेतू नाही. पण आंदोलनाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी व्हायला हवा. हा हेतू कुठेतरी भटकला आहे असे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here