Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारानंतर त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत ब्लॉगमधून दिली आहे. (Amitabh Bachchan)
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, शस्त्रक्रियेनंतर अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, रुग्णालयातून घरी आल्यानंतरचा काळ हा सर्वात आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सावरण्यासाठी वेळ लागतो, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ( Amitabh Health Update)
https://prahaar.in/2026/07/21/some-are-attempting-to-spread-anarchy-under-the-guise-of-the-protests-in-delhi/
मात्र, त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली किंवा कोणत्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Bollywood)
82 वर्षीय अमिताभ बच्चन आजही चित्रपट, जाहिराती आणि ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) सारख्या कार्यक्रमांमधून सक्रिय आहेत. तसेच ते नियमितपणे ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतात. काही दिवसांपूर्वी ते FIFA स्पर्धेतील सामन्यांबाबतही नियमित पोस्ट करत होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. (Entertainmnet News)
https://prahaar.in/2026/07/21/production-warrant-issued-against-anmol-bishnoi-in-the-baba-siddique-murder-case-special-court-order/
सध्या अमिताभ बच्चन घरी विश्रांती घेत असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामात रुजू होतील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Bollywood News)